Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या दिवशीबकरी ईद म्हणजे काय बकरीला बळी का देतात?

Bakri Eid
, मंगळवार, 27 जून 2023 (10:10 IST)
‘ईद-अल-अधा’
‘ईद-अल-अधा’या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या 10 व्या दिवशी ‘ईद-अल-अधा’चा दिवस येतो.
या दरम्यान मुस्लीम बांधव कोणताही उपवास करत नाही. या महिन्यात ‘हज्ज यात्रे’चे आयोजन मोठ्या प्रमाणवर केले जाते.
 
त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अधा’होय. ही ईद अडीच दिवस साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.
 
‘कुराण’सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे ‘कुरआन’मध्ये सांगितले आहे.
 
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’
 
मुस्लिम बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सण ‘रमजान ईद’आणि ‘बकरी ईद’.हे सण मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करताना दिसतात. येत्या १२ ऑगस्टला देशभरात ‘बकरी ईद’ साजरी केली जाणार आहे. या सणाला ‘ईद उल अजहा’किंवा ‘ईदे-अजहा’म्हणूनही ‘बकरी ईद’ला संबोधले जाते. यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा!
 
बकरी ईद का साजरी केली जाते? जाणून घ्या*
मुस्लिम बांधवांचे वर्षातील 2 महत्त्वाचे सण म्हणजे एक रमजान ईद (Ramadan Eid)आणि बकरी ईद. मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात.
 
रमजान ईद नंतरचा मोठा सण म्हणून हा दिवस ओळखला जातो. यावेळी मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात तसेच एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छाही देतात. यादिवशी घरोघरी शेवया, मिठाई आणि पक्वान्न बनवली जातात आणि कुटुंबातील मंडळी एकत्र मिळून याचा आस्वाद घेतात.
 
बकरी ईद का साजरी केली जाते? : 'ईद उल जुहा' चा अर्थ म्हणजे 'बलिदानाची ईद'. इस्लाम धर्मावर ज्यांची आस्था आहे त्यांच्यासाठी हे प्रमुख पर्व आहे. हे पर्व रमजानच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी साजरे केले जाते. मुस्लिम मान्यतानुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईलला याच दिवशी अल्लाहच्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाहने हजरत इस्माइलला जीवन दान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पर्व साजरा केले जाते.
webdunia
R S
 जाणून घ्या बलिदानाची कहानी: ईद उल जुहाचे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात जुल हिज्जमध्ये साजरे केले जाते. या दिवशी देशभरातील मुसलमान मक्का (साउदी अरब) मध्ये एकत्र येऊन हज साजरी करतात. ईद उल जुहाचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. या दिवशी जनावराचा बळी देणे एक प्रकारचे प्रतिकात्मक बलिदान आहे, अशी प्रथा समजली जाते.
धर्म जात यापेक्षाही मोठी शक्ती असते माणुसकीची, एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊया बकरी ईदची...
 
ईद-अल-अधा’
याला ‘बकरी ईद’ किंवा ‘त्यागाचा सण’ असे संबोधले जाते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते.
अल्लाहने ‘हजरत ईब्राहीम’कडे त्याच्या मुलाचा बळी मागितला. तेव्हा क्षणाचाही विचार नं करता आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी ईब्राहीम पुढे सरसावताच अल्लाहने ‘इसहाक’च्या (ईब्राहीमचा मुलगा) जागी ‘बकरी’ प्रकट केली आणि ईब्राहीमला सांगितले की“तुझी माझ्यावरची निष्ठा पडताळण्यासाठी मी तुझी कसोटी घेतली आणि त्यात तू यशस्वी देखील झालास.”
 
‘ईद-अल-अधा’या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या 10 व्या दिवशी ‘ईद-अल-अधा’चा दिवस येतो.
या दरम्यान मुस्लीम बांधव कोणताही उपवास करत नाही. या महिन्यात ‘हज्ज यात्रे’चे आयोजन मोठ्या प्रमाणवर केले जाते.
 
त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अधा’होय. ही ईद अडीच दिवस साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.
 
‘कुराण’सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे ‘कुराणा’त सांगितले आहे.
 
बकरी ईद दिवशी *_
‘बकरी ईद’दिवशी मुस्लिम नागरिकांच्या घरी काही चौपाया जनावरांची खास करून बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर ते मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरिबांना व अनाथ, आप्त व नातेवाईकांना वाटप केले जाते. तसेच रंगीबेरंगी नवीन कपडे, सुगंधी दरवळ, खमंग आणि चमचमीत पदार्थ आणि एकमेकांना ईद मुबारक असे म्हणत अलिंगन देत शुभेच्छा देत असे. तर या दिवशी पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण उत्साहाचे असते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Grace of Maruti मंगळवारी हे 5 उपाय करा आणि मारुतीची कृपा मिळवा