Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत सहा माजी मुख्यमंत्र्यांची मुले रिंगणात

Andhra Pradesh
, सोमवार, 8 एप्रिल 2024 (15:37 IST)
Andhra Pradesh assembly elections : राज्यातील 6 माजी मुख्यमंत्र्यांची मुले आगामी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत लढताना दिसणार आहेत. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी पुलिवेंदुला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आहेत.
 
वाईएसआर(YSR )कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुलिवेंदुला मतदारसंघाचे राजशेखर रेड्डी यांनी 1978 ते 2009 दरम्यान सहा वेळा प्रतिनिधित्व केले होते. 2 सप्टेंबर 2009 रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवत होते.
 
तीन वेळा मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश मंगळागिरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांचा या जागेवरून पराभव झाला. लोकेशला प्रामुख्याने वायएसआरसीपीच्या एम. लावण्या यांचे आव्हान असेल.
 
लोकेश हा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेते एनटी रामाराव (एनटीआर) यांचा नातू आहे. एनटीआरने 1982 मध्ये तेदेपा (टीडीपी)ची स्थापना केली. तेलुगू अभिनेते आणि हिंदुपूरचे विद्यमान आमदार एन. बालकृष्ण हे एनटीआर यांचे पुत्र आहेत. ते पुन्हा एकदा हिंदुपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
एनटीआर कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या हिंदूपूरचे प्रतिनिधित्व प्रथम रामाराव आणि त्यांचा मोठा मुलगा एन. हरिकृष्ण यांनी केले. 2014 आणि 2019 मध्ये बाळकृष्ण हिंदूपूर मतदारसंघातून विजयी झाले होते आणि यावेळी विजयाची 'हॅट्ट्रिक' करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. तेनाली मतदारसंघातून निवडणूक लढवणारे जनसेना नेते एन. मनोहर माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांचा मुलगा आहे.
 
माजी मुख्यमंत्री एन. जनार्दन रेड्डी यांचा मुलगा एन. रामकुमार रेड्डी वायएसआरसीपीच्या तिकिटावर व्यंकटगिरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आणखी एक माजी मुख्यमंत्री के. विजय भास्कर रेड्डी यांचा मुलगा के सूर्य प्रकाश रेड्डी ढोणे विधानसभा मतदारसंघातून तेदेपा (टीडीपी)च्या तिकीटावर नशीब आजमावणार आहे.
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षा शर्मिला यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली