Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कश्मीर मध्ये बर्फवृष्टी पहायला जातांना हे लक्षात ठेवणे

Kashmir Snowfall
, बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (08:00 IST)
नवीन वर्ष लागल्यावर सुरवातीच्या महिन्यात कश्मीर पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीने झाकले जाते. कश्मीरला पृथ्वी वरील स्वर्ग म्हंटले जाते. आणि थंडीमध्यें हा स्वर्ग दुपटीने सुंदर बनतो. बर्फवृष्टी आणि सुंदर वातावरण पहायला जातांना जर तुम्ही थंडीच्या दिवसात कश्मीरला जात असाल तर काही गोष्टींचे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 
 
थंडीत कश्मीर हे 2 ते 3 दिवसांत फिरणे होत नाही. थंडीत कश्मीर मध्ये खूप जास्त बर्फवृष्टी होते. ज्यामुळे रस्ते अवरुद्ध होतात. आणि मग कमी दिवसांत फिरू शकत नाही. यासाठी जास्त सुट्टी घेऊन जाणे म्हणजे यांसारख्या समस्यांपासून वाचू शकाल. कश्मीर मध्ये लाइव स्नोफॉल बघायचा असल्यास तर टिकिट बुक करण्याअगोदर कश्मीरचे हवामान बघून घेणे. बर्फवृष्टी वेळेस कश्मीरमध्ये जमिनीवर चालायला त्रास होतो. तुम्हाला आशा बुटांची गरज असते जे ओले होणार नाही. 
 
कश्मीर जात आहात तर छत्री घेऊन अवश्य जा. कारण बर्फवृष्टी ने तुमचे कपडे ओले होऊ शकतात. साधे बूट किंवा हील्स घालून जाऊ नये कारण याने चलतांना समस्या निर्माण होतील. तसेच जास्त कपडे सोबत घेऊन जावे  व गरजेचे सामान देखील घेऊन जावे. कारण कश्मीर मध्ये प्रत्येक सामान खूप महागडे मिळते. तसेच सोबत औषधी व पॅकेज फूड नक्की सोबत घेऊन जा. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री मल्लिका राजपूतची गळफास लावून आत्महत्या