Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवास करणार्‍या खास मोबाइल अॅप्स

प्रवास करणार्‍या खास मोबाइल अॅप्स
, बुधवार, 10 मे 2017 (11:31 IST)
भ्रमंती करणे हे सर्वांच्याच आवडीचे असते. कधी निसर्ग भ्रमंती, तर कधी एखादे गाव, डोंगर, किल्ले आदी भ्रमंतीवर पुरूष असो वा महिला सगळेच उत्साहात बाहेर पडतात, पण येणार्‍या अडचणीवर मात करता करता बर्‍याच जणांची दमछाक होते. असं वाटतं की यामध्ये कुणीतरी मदत करणारे हवे ज्यामुळे या अडचणी सहज दूर होऊ शकतील, येणारच नाहीत.
 
स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे, त्यामुळे तो तरी प्रत्येकजण सोबत ठेवतोच. फक्त त्याच स्मार्ट फोनवर खशली देण्यात आलेले अॅप्स डाउनलोड केल्यास एक सहकारीच सोबत घेऊन गेल्यासारखे होईल. ते कोणते अॅप्स आहेत, चला तर मग, पाहू या-
गुगल ट्रान्सलेट- भारतात भ्रमंती करीत असताना हे अॅप म्हणजे एक दुभाषीच म्हणावा लागेल. तुम्हाला इतर भारतीय भाषेत काय बोलायचे आहे हे तुम्हास येणार्‍या भाषेत लिहा, टाईप करा अॅप तुम्हाला लागलीच भाषांतर करून देईल. त्यामुळे तुमची दुभाषिकाची गरज पूर्ण करणारे अॅप तुमच्या स्मार्ट फोनवर हवेच.
 
लीन कोड्स- हे अॅप ऑफलाईनदेखील वापरता येते, म्हणजे यास इंटरनेटचे कनेक्शन सुरू असणे बंधनकारक नाही, हे या अॅपचे वैशिष्ट्य महणावे लागेल. नवीन शहरात तुम्ही कोठे आहात यासाठी हे मार्गदर्शक अॅप आहे. एखाद्या शहरात जागेचे नाव कसे उच्चारावे याबद्दल देखील हे अॅप मदत करते.
 
उबर, ओला- ही दोन्ही नावे तुम्ही ऐकलेली असतील, तुम्हास परिचयाची असतीत. नवीन शहरात ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही तेथील लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करू शता पण यामध्ये तुमचा वेळ जाण्याची शक्यता असते पण उबर, ओला यामुळे तुमचा मूल्यवान वेळ वाचू शकतो, अर्थात त्यांनी दिलेल्या सेवेमुळे हे बर्‍याचदा सिद्ध झालेले आहे. तुम्ही अद्याप हे अॅप डाउनलोड केले नसेल तर हीच वेळ आहे हे अॅप डाउनलोड करण्याची.
 
स्मार्ट 24 द 6- हे सिक्युरिटी अॅप आहे. ज्याची जोडणी थेट पोलिस कार्यलयाशी करता येते. शिवाय याची एक खास बाब म्हणजे या अॅपमध्ये एक स्पेशल पॅनिक बटण दाबल्यास पोलिसांशी किंवा तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकाशी संपर्क होतो. या अॅपचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपद्वारे फोटो काढता येतात. सोबत ऑडिओ, व्हिडिओदेखील रेकॉर्ड करता येतो आणि ट्रॅकिंगदेखील करता येते, जे तुम्हाला नवीन जागेत सुरक्षित ठेवायला मदत करते.
 
ओ वाय ओ (जधज) रूम्स- तुम्ही नवीन ठिकाणी जात आहात म्हटलं की तिकिटे, आरक्षण, रूम बुकिंग आदी बाबी प्राधान्याने करता पण काही अडचणींमुळे तुम्ही बुक केलेली रूम उपलब्ध होत नसेल तर हे अॅप तुम्हाला मदत करेल. ही 5 अॅप्स भ्रमंतीला निघताना तुमच्या स्मार्ट फोनवर असावीत ज्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो.
 
- अमित कामतकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘टॉयलेट एक प्रेम कथा’साठी अक्षयने घेतली मोदींची भेट