Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुष्कर मध्ये खेळली जाते जगातील सर्वात अद्वितीय धुळवड, जाणून घ्या मनोरंजक गोष्टी

pushkar holi
, रविवार, 24 मार्च 2024 (10:30 IST)
Pushkar Holi 2024 : 25 मार्चला होळीचा सण साजरा केला जाईल. होळी पासून रंग खेळण्यास सुरवात होते. तसेच हा सण राजस्थानमधील पुष्कर मध्ये देखील उत्साहात साजरा केला जातो. पुष्कर मध्ये या सणाची तयारी सुरु झाली आहे. पुष्कर राजस्थानमधील एक प्रसिद्ध शहर आहे. जिथे जागतिक मेळे भरतात. पुष्कर मध्ये होळी, धुळवड यांचे विशेष महत्व आहे. यादिवसांमध्ये इथे येणाऱ्यांना वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव येतो. येथील एक खास गोष्ट आहे, तुम्ही पुष्करच्या होळीमध्ये घेतल्यास सोबत राजस्थानमधील इतर प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. आईआरसीटीसी ने एक टूरिस्ट पॅकेज सादर केले आहे. ज्यामध्ये पुष्करच्या व्यतिरिक्त राजस्थानमधील इतर प्रमुख स्थळांची भेट सहभागी आहे. या 6 दिवसाच्या टूर पॅकेज सोबत जेवणाची देखील सुविधा दिली जाईल.  
 
राजस्थान मधील पुष्कर हे आपली सांस्कृतिक महत्वता याकरिता प्रसिद्ध आहे. पण येथील होळी, धुळवड  हे उत्सव  अत्यंत सुंदर साजरे केले जातात. प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी, देश-विदेशातील पर्यटक इथे केवळ होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी येतात. होळी आणि धूळवड यादिवशी लोक, अनेक ठिकाणी डीजेच्या धुन वर डांस करतात. वराह घाट आणि ब्रह्मा चौक येथे होळीच्या उत्सवाचे विशेष आयोजन केले जाते. इथे कपडे फाडनारी धुळवड खेळली जाते. जर तुम्ही या दिवसांमध्ये राजस्थानला जात असाल तर, आईआरसीटीसीच्या या  पॅकेजचा  नक्की लाभ घ्या. राजस्थानच्या पर्यटन विभाग द्वारा पुष्कर होळी मेळयाचे आयोजन 22 मार्च 2024 ते  26 मार्च 2024 पर्यंत केले जाईल. पुष्कर येथील होळी महोत्सव चार दिवस पुष्कर शहरच्या वराह घाट वर आयोजित केला जाईल. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Holi Jokes : भयानक समस्या