Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दलित अंजेड्यासाठी बंगारू लक्ष्मण यांचे पुनर्वसन

दलित अंजेड्यासाठी बंगारू लक्ष्मण यांचे पुनर्वसन

अभिनय कुलकर्णी

कुशाभाऊ ठाकरे नगर (इंदूर) , गुरूवार, 18 फेब्रुवारी 2010 (19:31 IST)
लाच घेताना एका स्‍टींग ऑपरेशनमधून अडकलेले भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे पुनर्वसन करण्‍याचा प्रयत्न भाजपच्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत केला जात असून दलित अजेंड्यासाठी त्यांना पुन्‍हा सक्रीय करण्‍याचा प्रयत्न नितिन गडकरी यांनी चालविला आहे.

लक्ष्मण भाजपचे पहिले दलित अध्यक्ष होते. त्‍याचा फायदा भाजपने भरपूर उचलण्‍याचा प्रयत्न केला. मात्र लाच प्रकरणात अडकल्‍यानंतर पक्षाने त्यांच्‍यापासून अंतर ठेवण्‍यात भले असल्‍याचे मानले होते. लक्ष्‍मण यांना पक्षाचे अध्यक्षपदही सोडावे लागले होते. पक्षाच्‍या बंगळुरू अधिवेशनातही ते दिसले नाहीत.

मात्र गडकरींच्‍या अध्यक्षतेखालील या अधिवेशनात पुन्‍हा बंगारूंना घासून पुसून समोर आणले जाणार असल्‍याचे दिसत आहे.

भाजपला २०१४ मध्‍ये सत्तेत आणण्‍यासाठी किमान मतांमध्‍ये 10 टक्के वाढ होण्‍याची आवश्‍यकता आहे. ही 10 टक्के मते दलित व मागास जातीतील लोकांकडूनच येऊ शकतात हे हेरून गडकरींनी दलित नेते बंगारू लक्ष्‍मण यांना पुढे आणले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi