Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

36 दिवसात करणार ‘दिलवाले’ सिनेमाचे प्रमोशन

36 दिवसात करणार ‘दिलवाले’ सिनेमाचे प्रमोशन
, मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (13:26 IST)
‘रा-वन’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रमोशन करणारा शाहरुख खान आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपला तीनपट वेळ कमी करणार आहे. मागील चित्रपटाचे त्याने 90 दिवस प्रमोशन केले होते.
 
आपल्या चित्रपटांचा प्रचार करण्यासाठी आमिर खान अधिक दिवस घेतो. 35 ते 50 दिवस तर तो चित्रपटाच्या प्रचारासाठी देतोच. सलमान 25 दिवस, अक्षयकुमार 15 ते 18 दिवस, अजय देवगण 20 ते 25 दिवस अगोदर चित्रपटाच्या प्रचाराचा नारळ फोडतात. यामध्ये शाहरुखने ‘हॅपी न्यू इयर’चा तीन महिने प्रचार करत कळस गाठला होता. वरुण धवन, आलिया भट्ट , श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या नवोदित स्टार्सनीदेखील चार महिन्यांपर्यंत आपल्या चित्रपटांचे प्रमोशन केलेले आहे. शाहरुखचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला प्रोमो दिवाळीत रिलीज होणार्‍या सलमानच्या चित्रपटासोबत दाखवण्यात येणार आहे. 
 
म्हणजे ‘दिलवाले’ चित्रपटाचा शाहरुख केवळ 36 दिवस प्रचार करू शकणार आहे. काजोलचे पुनरागमन हे ‘दिलवाले’चा यूएसपी मानला जात आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच प्रमोशनाला सुरुवात करण्यात आली होती. शिवाय शाहरुख आपल्या वाढदिवशी म्हणजे ऑक्टोबरला चित्रपटातील एक गाणे लाँच करणार असल्याचे समजते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi