Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाखात विकले गेले होते सिल्क स्मिताचे अर्धे खाल्लेले सफरचंद

लाखात विकले गेले होते सिल्क स्मिताचे अर्धे खाल्लेले सफरचंद
Silk Smitha Birth Anniversary बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक एक्ट्रेसेस आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात साउथ इंडस्ट्रीने केली. तथापि आज साऊथ चित्रपटसृष्टीत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या व्यक्तिरेखा आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यापैकी एक होती सिल्क स्मिता. 70 ते 90 च्या दशकापर्यंत त्यांनी इंडस्ट्रीवर जबरदस्त राज्य केले. 1979 साली 'इनाय थेडी' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. आज या अभिनेत्रीची 63 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील एलुरु येथे एका गरीब कुटुंबात झाला.
 
सिल्क स्मिता यांनी लहान वयात आपले वडील गमावले ज्यानंतर त्यानंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि अवघ्या 14 व्या वर्षी बळजबरीने लग्न केले गेले, परंतु सासरच्या लोकांच्या त्रासामुळे त्या चेन्नईला पळून गेल्या. जिथे त्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, त्यानंतर 1979 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
 
Silk ने कमी काळात ओळख निर्माण केली
आपल्या बोल्ड अदा यामुळे कमी वेळात चांगलीच ओळख निर्माण केली. त्याकाळी अभिनेत्री गाणे आणि सीनसाठी 50 हजार रुपये मानधन घेत असत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 360 चित्रपटांमध्ये काम केले, पण शेवटी एकाकीपणाशी झुंज देत अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक किस्से समोर आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्रीच्या अर्धा खाल्लेल्या सफरचंदाचा लिलाव करण्यात आला, ज्याची किंमत एक लाख रुपये होती. वास्तविक ही घटना आहे जेव्हा एका शुटिंगदरम्यान अभिनेत्रीने सफरचंद खाल्ले होते, पण चावल्यानंतर ते जसेच्या तसे ठेवले होते. त्यावेळी लोकांना अभिनेत्रीचे वेड लागले होते.
 
Silk वर बेस्ड फिल्म होती द डर्टी पिक्चर
सिल्क स्मिताने वयाच्या 36 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. अभिनेत्रीला एकटेपणामुळे त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. 2 डिसेंबर 2011 रोजी सिल्क स्मिताच्या जयंतीनिमित्त विद्या बालन आणि नसीरुद्दीन शाह यांचा 'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट सिल्क स्मिताच्या जीवनावर बनवण्यात आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pushpa 2: 'पुष्पा 2'च्या सेटवर अल्लू अर्जुनची तब्येत बिघडली!