Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

deepika
, मंगळवार, 5 मार्च 2024 (13:38 IST)
social media
वर्ष 2024 मध्ये परत एक चांगली बातमी येत आहे. सध्या आपण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगबद्दल बोलत आहोत. दीपिका आणि रणवीरने नुकतीच त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही.ते लवकरच आई-बाबा होणार आहे. दीपिका दोन महिन्यांची गरोदर असून त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर मध्ये होणार आहे. 
 
 दोघेही अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये डान्स करताना दिसले होते. पण लवकरच लोकांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली.
 
दीपिकाच्या गरोदरपणाच्या घोषणे नंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर डान्स करताना दिसले. दोघांना स्टेजवर एकत्र नाचताना पाहून लोक नुसतेच त्यांच्याकडे बघत राहिले. पण जेव्हा हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरु केले. वास्तविक, दीपिका चा डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहे. नगाडा संग ढोल  आणि गल्लन  गुडिया या गाण्यावर नाचत होते. 
 
व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी त्यांचे गोड कौतुक केलं आहे तर काही चाहत्यांनी सांगितले की, अभिनेत्री गरोदरपणातही असाच डान्स करत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिनेत्रीने असा डान्स करू नये. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. पती रणवीरनेही याचा विचार करायला हवा, असे अनेकांनी सांगितले. त्याने आपल्या गर्भवती पत्नीला असे नाचायला लावू नये.
 
लोक दीपिकावर टीका करू लागले की ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. दीपिका दोन महिन्यांची गर्भवती आहे. या दोघांनी 29 फेब्रुवारीला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली होती, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. सोशल मीडियावर अभिनंदनाचा पूर आला होता. त्यानंतरच दीपिका रणवीरसोबत जामनगरला रवाना झाली.
 
दीपिका रणवीरसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. यानंतर रणवीर सिंग आपल्या पत्नीला गर्दी आणि पापांराजी पासून वाचवताना दिसला. तेव्हा लोकांनी रणवीरचे खूप कौतुक केले पण आता दीपिकासोबत डान्स केल्याने लोक त्याला ट्रोल करत आहेत.
 
Edited By- Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले