Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी

शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी
, सोमवार, 3 जुलै 2023 (14:42 IST)
Shiv Thackeray injured सध्या दक्षिण आफ्रिकेत 'खतरों के खिलाडी 13' या बहुचर्चित कार्यक्रमाचं  शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पण प्रसारण होण्यापूर्वीच कार्यक्रमातील अनेक स्पर्धक स्टंट करताना जखमी झाले आहेत. 
 
शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शिवच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेली दिसत आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटाला टाकेदेखील पडले आहेत. शिव नेहमीच लढवय्या म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चाहते त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला 'योद्धा' म्हणत आहेत. 
 
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अनेत स्पर्धक जखमी झाले आहेत. नायरा बॅनर्जी, रोहित रॉय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
 
'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमातील स्पर्धक स्टंटबाजी करताना दिसून येतात. दरम्यान त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आता 15 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गदर 2' मध्ये नाना पाटेकर !