Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेक्सी काश्मीराने केली रणबीरची गोची

सेक्सी काश्मीराने केली रणबीरची गोची
'वेक अप सिद'मध्ये रणबीर कपूर आणि सेक्सी काश्मीरा शाह आहे. या दोघांत एक 'हॉट' दृश्य चित्रित केले जाणार होते. चित्रपटात काश्मीरा रणबीरची शेजारी दाखवली आहे. रणबीरला ती आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, असे दाखवले आहे. 

या शुटींगदरम्यान, काश्मीराने खूपच कमी कपडे घातले होते. रणबीरला ती जाळ्यात ओढत होती. पण त्या कपड्यातल्या 'सेक्सी' काश्मीराला पाहून रणबीर पार नर्व्हस झाला. त्याच्या चेहर्‍यावर नीट भावही येत नव्हते. दिग्दर्शक अयान मुखर्जी त्यामुळे नाराज झाले. त्यांनी अनेकदा हा शॉट चित्रित केला. कसा बसा तो ओके झाला. तेव्हा कुठे रणबीरचा जीव भांड्यात पडला. रणबीरची ही हालत पाहून सेटवरच्या मंडळींची चांगलीच करमणूक झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi