Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिदम्बरम एक भाग्यशाली अर्थमंत्री

चिदम्बरम एक भाग्यशाली अर्थमंत्री

वेबदुनिया

नवी दिल्ली , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (15:25 IST)
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी यंदाचे बजेट सादर करताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केल्यावर लोकसभेतील सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात आनंद व्यक्त केला.

चिदम्बरम यांच्या दोन तास चालू असलेल्या भाषणात शेतकर्‍यांच्या दयनीय अवस्थेचा उल्लेख झाल्याबरोबर संसंद सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

अर्थमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करताच सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहून आनंद व्यक्त केला. पहिल्या रांगेत बसलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही चिदम्बरम यांचे अभिनंदन केले.

विरोधी पक्ष सदस्यांनी अल्पभूधारक शेतकर्‍यांशिवाय इतर शेतकर्‍यांविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा प्रयत्न सत्ताधारी‍ पक्षाच्या सदस्यांच्या आनंदात विरघळून गेला. सलग पाचव्यांदा बजेट सादर करणारे चिदम्बरम हे एक भाग्यशाली अर्थमंत्री असल्याचा उल्लेख केला गेला.

जेष्ठ नागरीकांना आयकरात सूट दिल्याबद्दल लोकसेभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि दुचाकीवरील उत्पादन शुल्कात सूट दिल्याबद्दल उद्योगपती राहूल बजाज यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत होते. यावेळी काही राज्यसभा सदस्यही उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi