Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशाचे राज शाहरुखच्या शब्दात....

यशाचे राज शाहरुखच्या शब्दात....
'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. वा...वा... लाजबाब... अशी प्रशंसा मिळवणारा 'रब ने बना दी जोडी' हिट झाली. घवघवीत यश प्राप्त केलेल्या या चित्रपटाबद्दल किंग खानच्या शब्दात ऐकूया!...

तू चित्रपट साइन करताना विचारपूर्वकच चित्रपट साइन करतो. मग 'रब ने बना दी जोडी' हा चित्रपट तुला का साइन करावा वाटला?
मी यशराज फिल्म्सचा चित्रपट साइन करताना कुठलाच विचार करत नाही. त्यांच्यात व माझ्यात होणार्‍या चर्चेतच चित्रपट साकरला जातो. यशजींच्या 'चल आजा पिक्चर कर ले!' असे सांगण्यात चित्रपट साइन होत असतो. जानेवारी महिन्यातील गोष्ट आहे. आदित्यने मला सांगितले की, त्याने माझ्यासाठी एक कथा लिहिली आहे. तेव्हा मी असा विचार केला की, जर त्याने माझ्यासाठी कथा लिहिली असेल तर तो मला नक्कीच सांगेल. आणि तसेच झाले. त्याने कथा मला दाखवली. मी कथा ऐकल्यानंतर 'वा क्या बात है।' असे म्हटल्यावर लगेच आदीने तीन महीन्यानंतर शूटिंगचा नारळ फोडायचा आहे, असे सांगितले. बस्स, मग या चित्रपटात माझे स्थान निश्चित झाले. बॉलीवुडमध्ये असे काही लोक आहेत की, त्यांचा चित्रपट साइन करताना मला काहीच विचार करावा लागत नाही. करण जोहर, फराह खान, यशजी व आदित्य जेव्हा मला विचारणा करतात तेव्हा मी त्यांना नाही म्हणत नाही.

WD
अभिनेत्री अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरवात करत आहे. याविषयी तुला काय वाटते?
खरं! सांगायचे झाल्यास मी जेव्हा पहिल्यांदा अनुष्काला भेटलो तेव्हा मला तिच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे दिसून आले. मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर उभा आहे की, मला युवा पिढीसोबत काम करण्याची संधी ‍मिळत आहे. तेव्हा मला असे वाटते की, मी वेगळ्या विचारसरणीचा आहे. अनुष्कासोबत काम करताना मला एक नवी दृष्टी मिळाली. माझी अभिनय करण्याची एक स्टाइल ठरलेली आहे. मला काही लोकांनी विचारले की, तुमच्यासोबत नवीन चेहरे काम करतात, त्यांना अभिनयाचे धडे तुम्ही शिकवले असतील. त्यानंतर मला अनुष्काजवळ जाऊन तिचे आभार मानावेसे वाटले.

webdunia
WD
आदित्य चोप्रांचा हा तिसरा चित्रपट असून तू त्यांच्या तीनही चित्रपटात काम केले आहेस. याविषयी तुला काय वाटते?
'डर' या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आदित्य आणि माझी मैत्री झाली होती. तो या चित्रपटाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होता. आम्ही दोघे समान असून आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळेच आम्ही चांगले मित्र बनू शकलो. आदित्यप्रमाणे मी पण लाजाळू आणि एकांतप्रिय आहे. मी अभिनेता असल्यामुळे लोकांना माझ्याविषयी अधिक म‍ाहिती आहे. परंतु आदित्यविषयी म्हणावी तशी माहिती नाही. मी सेटवर नेहमी आदित्यला सर म्हणून बोलत असतो. मी आदित्यचे आभार मानू इच्छितो. कारण त्याने मला त्याच्या तिसर्‍या चित्रपटातही काम करण्याची संधी दिली. मला त्याच्या शेवटच्या चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे. याबाबत मी स्वत: ला भाग्यशाली समजतो की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली.


webdunia
WD
या चित्रपटात तुझा लुक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी तुला काय वाटते?
चित्रपटातील दोन भूमिका एकमेकांपासून एकदम वेग-वेगळ्या आहेत. त्यामुळे दोघांना वेगळा लूक देण्‍याची आवश्यकता होती. आम्ही अशा प्रकारच्या भूमिकांना रेखाचित्र किंवा विनोदी बनवू इच्छित नव्हतो. कारण चित्रपटाच्या कथेसाठी लूक अत्यंत महत्त्वाचा असतो. मी एक दिवस मिशा लावून एका वेगळ्या स्टाईलमध्ये केसांची रचाना करून आदित्यला दाखवले. तेव्हा आदित्यला हवा असलेला वेगळा लूक सापडला असल्याचे त्याने मला सांगितले होते.

पंजाबमध्ये शूटींग करताना काय वाटले?
यापूर्वीही मी पंजाबमध्ये शूटींगसाठी गेलो आहे. पंजाबचे लोक अत्यंत प्रेमळ आहेत. ते नेहमी आपली काळजी घेत असतात. दर्जेदार जेवण, प्रेम आणि शानदार लोकेशन हे पंजाबचे खास वैशिष्ट्ये. येथे शूटींगदरम्यान गर्दी जमा होते. परंतु या गर्दीचा कोणालाही त्रास होत नाही. खालसा कॉलेजची इमारत पाहून मी तर अचंबित झालो. मला सुवर्ण मंदिर पाहण्‍याची संधीही मिळाली. मंदिरात मी माथा टेकून आपले कुटूंब, चित्रपट आणि मी ओळखत असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना केली. तेथे जाऊन माझ्या मनाला सुखशांती मिळाली आहे.

या चित्रपटाशी संबंधी एखादी खास घटना सांगू शकशील का?
शूटींगच्या सुरवातीचे सात-आठ दिवस माझ्यासाठी विशेष आठवणीचे आहेत. मी सुरिंदर साहनीच्या लूकमध्ये सेटवर जात असे तेव्हा मला कोणीच ओळखत नसत. 30 वर्षानंतर आठवणार्‍या क्षणाची मला त्याच दिवशी आठवण झाली. 30 वर्षानंतर जेव्हा मी स्टार नसेल तेव्हा मला कोणीही ओळखणार नाही. त्या क्षणाचा मी शूटींग दरम्यान अनुभव घेतला. माझ्याबरोबर असे काही व्हावे असे मला वाटत नाही.

webdunia
WD
रोमांटिक आयकॉन शाहरुख खानने एका प्रेमकथेत एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका साकरली आहे. याबद्दल काय वाटते?
मी नेहमी सांगत आलोय की, मी एका सुपरस्‍टार शाहरूख खान नावाच्या व्यक्तीचा कामगार आहे. मी त्या सुपरस्टार किंवा हिरो किंवा रोमांटिक आयकॉनसाठी काम करत आहे. मी कधीच असा विचार केला नाही की, मी सुपरस्टार आहे. स्वत:‍विषयी सांगायचे असेल तर मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे. जो सामन्य व्यक्तीप्रमाणे विचार करतो आणि त्यांच्याप्रमाणे राहतो. मी मध्यमवर्गीय कुटूंबातील असल्याचे कधीच विसरत नाही. लोकांना वाटत असले की, मी एक लाख स्क्वेअर फूट जागा असलेल्या बंगल्यात राहतो. माझ्याजवळ महागड्या गाड्या आहेत. परंतु हे सर्व त्या शाहरूख नावाच्या अभिनेत्याला मिळालेलं आहे.

रोमांटिक आयकॉनचा पुरस्कारही त्या अभिनेत्याला मिळाला आहे ज्यासाठी मी काम करतो. मी जेवढ्या रोमांटिक भूमिका केलेले चित्रपट आपण पाहिले असतील तर आपल्याला नक्कीच हे जाणवेल की सर्व मध्यमवर्गीय हावभाव असलेल्या भूमिका आहेत. 'रब ने बना दी जोड़ी’ मधील सुरिंदर तर मला माझ्यासारखाच वाटतो. जर मी स्टार बनलो नसतो तर मीसुद्धा सुरिंदरप्रमाणे मिशा आणि केस रचना असलेला व्यक्ती असतो. मला असे वाटत की, राज आणि राहूल यांनी आता आपला लूक सुरीला देऊन टाकावा. कारण तो मनाने खूप चांगला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi