Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रेग चॅपेल

ग्रेग चॅपेल

राकेश रासकर

नाव : ग्रेग स्टीफन चॅपेल
जन्म : ७ ऑगस्ट १९४८
ठिकाण : अ‍ॅडलेड, द. ऑस्ट्रेलिया
देश : ऑस्ट्रेलिया
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, पर्थ, १९७०
वन डे पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, सिडनी, १९७१
शैली : उजव्या हाताचा फलंदाज व मध्यमगती गोलंदा

ग्रेग चॅपेल हे ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. ४८ कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती. ७००० धावांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले ऑस्टेलियन खेळाडू होते.

त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी त्यांच्या पदार्पणातील व शेवटच्या कसोटीत शतक नोंदवले होते. कर्णधारपद मिळाल्यावरही पहिल्या व दुसर्‍या डावात शतक नोंदवले. भाऊ इयान चॅपेलबरोबर खेळताना दोघांनी एकाच कसोटीत शतक नोंदवले होते. त्यांचा आणखी एक विक्रम म्हणचे प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी १९७५-७६ या वर्षांत १५४७ धावा काढल्या. हा त्यांचा विक्रम २३ वर्षे अबाधित होता. ऑन साईडला त्याने मारलेले फटके आकर्षक असत.

क्रिकेटच्या त्यांच्या या योगदानाबद्दल १९७३ मध्ये विस्डेनतर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमनेही त्यांना गौरविले. १९८४ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. काही दिवसांपूर्वी ते भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांनी या काळात बरेच प्रयोग केले. मात्र, यात कुठल्याही निष्कर्षाप्रत आले नाहीत. त्यामुळे २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत संघ पहिल्याच फेरीत गारद झाला. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले.

कसोटी
सामने - ८७
धावा - ७११०
सरासरी - ५३.८६
सर्वोत्तम - २४७
१००/५० - २४/३१
बळी - ४७
सर्वोत्तम - ५-६१
झेल १२२

वन डे
सामने - ७४
धावा - २३३१
सरासरी - ४०.१८
सर्वोत्तम - १३८
१००/५० - ३/१४
बळी ७२
सर्वोत्तम ५-१५
झेल २३

Share this Story:

Follow Webdunia marathi