Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हांला त्यांची दया येत नाही का?" त्यावर यमदूत म्हणाले, "एकदाच असं झालं होतं. 
 
यमराजने सांगायला सुरुवात केली. एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला. भटकत भटकत राजा दुसर्‍या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्यादिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की, राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार, 'हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं. पण विधीलिखित अटळ असतं त्यामुळे असं काही संयोग आला की हंस राजच्या मुलीचं त्या सोळा वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हांला खूप वाईट वाटलं. हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काही कराल, तर फार बरं होईल." यावर यमदेव म्हणाले, "धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करील, त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही." 
 
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या