Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिपुंची लेखनसंपदा

दिपुंची लेखनसंपदा

वेबदुनिया

, शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (19:21 IST)
PR
PR
दिपुंच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द केज हा त्यांचा इंग्रजी कवितांचा संग्रह. 'एन एंथ्रोपॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री' हा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला. भाषांतराच्या बाबतीतही दिपुंनी फार थोर काम केले आहे. संत तुकारामांच्या अभंगाचा 'सेज तुका' या नावाने अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाने तुकोबांना 'ग्लोबल' केले. केवळ तुकारामच नव्हे तर ज्ञानेश्वरांचे अनुभवामृतही त्यांनी इंग्रजीत नेले. त्यांची अनेक पुस्तके हिंदी, गुजराती, जर्मन भाषांत अनुवादित झाली. अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांसाठी त्यांनी मराठी व इंग्रजीतून स्तंभलेखन केले. शब्द या लघुनियतकालिकाच्या संपादनाबरोबर 'न्यू क्वेस्ट'चेही ते संपादक होते. ऑर्फियस हा त्यांचा एकमेव कथासंग्रह. त्यांचे अनेक लेखन अजूनही प्रकाशित झालेले नाही.

त्यांची लेखनसंपदा अशी-

कविता
ऑर्फियस
शीबा राणीच्या शोधात
कवितेनंतरच्या कविता
चाव्या
दहा बाय दहा
मिठू मिठू पोपट आणि सुतक
तिरकस आणि चौकस
पुन्हा तुकाराम
शतकांचा संधीकाल
भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
एकूण कविता १, २, ३
चतुरंग
----
इंग्रजी
एन एथ्रॉपॉलॉजी ऑफ मराठी कविता, एब्म्युलन्स, ट्रॅव्हलिंग इन द केज, द रिझनिंग व्हिजन, टाटा, टेंडर आयर्निज, श्री ज्ञानदेव्ज अनुभवामृत, द माऊंटेन, नो मून मंडे,

Share this Story:

Follow Webdunia marathi