Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनारसे (साखरेचे)

अनारसे (साखरेचे)
साहित्य - तांदूळ, साखर, तूप, खसखस.
कृती - तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढी पीठी साखर   पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे कान कर्करोगाचे लक्षणे आहे, चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका