Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रताळ्याच्या पुर्‍या

रताळ्याच्या पुर्‍या
साहित्य- एक किलो रताळे, राजगिर्‍याचे  पीठ एक किलो, एक किलो रिफाइंड सोयाबिन तेल, अर्धा किलो साखर, विलायची 20 ग्रॅम, खोबरे शंभर ग्रॅम, काजू शंभर ग्रॅम.

पूर्वतयारी- रताळे गरम पाण्यात उकळून घ्यावे, उकळलेल्या रताळ्याची साल काढावी व कुस्करून घ्यावे, काजु बारीक करावा, विलायची बारीक करायची, खोबरे किसून घ्यायचे, साखर मिक्सर मधून काढून घ्यायची.

कृती- कुस्करलेल्या रताळ्याच्या मिश्रणात खोबरा किस, काजु व विलायची टाकायची. चांगल्या प्रतिच्या राजगिर्‍याचे पीठ मिसळून मिश्रण चांगले तिंबून घ्यावे. गॅसवर कढई ठेवायची. पोळपाटावर मिश्रणाच्या छोट्या पुर्‍या लाटायला सुरूवात करायची. तेल तळण काढण्या जोगते तापल्या नंतर तेलात हळूच पुरी सोडायची.

तांबुस रंग येईपर्यत पुरी तळायची. तळल्या गेलेली पुरी झार्‍याच्या साह्यने अलगद काढायची. पुरया वेताच्या टोपलीत कागद टाकून ठेवायच्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बटाट्याची जिलबी