Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ल्ड कप करंडक पटकावणाऱ्या अर्जेंटिनाला मिळणार 347 कोटी

वर्ल्ड कप करंडक पटकावणाऱ्या अर्जेंटिनाला मिळणार 347 कोटी
, मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (08:28 IST)
लिओनेल मेस्सीने दिमाखदार खेळ करत अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला. 36 वर्षांचं स्वप्न कतारमध्ये पूर्ण झालं.जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यानंतर मेस्सीसह अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांची मेहनत फळाला आली. सहाव्या वर्ल्ड कपवारीत मेस्सीचं देशासाठी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
अतीव समाधानाच्या बरोबरीने जेतेपदाने अर्जेंटिनाला प्रचंड अशा बक्षीस रकमेने गौरवण्यातही आलं. विजेत्या अर्जेंटिना संघाला तब्बल 347 कोटी रुपये मिळणार आहेत.
 
जेतेपदाच्या झळाळत्या करंडकासह अर्जेंटिनाचे खेळाडू आर्थिकदृष्ट्याही बळकट होणार आहेत.
एम्बापेच्या अफलातून खेळाच्या बळावर अर्जेंटिनाला टक्कर देणाऱ्या उपविजेत्या फ्रान्स संघाला 248 कोटी रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात येणार आहे. जेतेपदाने हुलकावणी दिली असली तरी पैशांच्या बाबतीत फ्रान्सच्या खेळाडूंची निराशा झालेली नाही.
 
सातत्यपूर्ण प्रदर्शन करत तिसरं स्थान पटकावणाऱ्या क्रोएशियाचा 223 कोटी रुपये बक्षीस रकमेने सन्मान होणार आहे. क्रोएशियाला चार वर्षांपूर्वी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
 
यंदाही ते जेतेपदाचे दावेदार होते. पण त्यांचा प्रवास सेमी फायनलमध्येच संपुष्टात आला. प्रस्थापित संघांची मक्तेदारी मोडून काढत दिमाखदार खेळ करणाऱ्या मोरोक्कोने चाहत्यांची मनं जिंकली.
 
मनं जिंकण्याबरोबरीने मोरोक्कोला 206 कोटी रुपये बक्षीस रकमेने गौरवण्यात आलं आहे.
क्वार्टर फायनलमध्ये हरलेल्या संघांना प्रत्येकी 140 कोटी रुपये रकमेने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रतवारीत ब्राझील, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इंग्लंड यांचा समावेश आहे.
 
तर प्री क्वार्टर फायनल फेरीत हरलेल्या संघाना प्रत्येकी 114 कोटी रक्कम प्रदान करण्यात येईल. या प्रतवारीत अमेरिका, सेनेगल, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्पेन, जपान, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.
 
वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 74 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. यामध्ये कतार, इक्वेडोर, वेल्स, इराण, मेक्सिको, सौदी अरेबिया, डेन्मार्क, ट्युनिशिया, कॅनडा, बेल्जियम, जर्मनी, कोस्टा रिका, सर्बिया, कॅमेरुन, घाना, उरुग्वे यांचा या गटात समावेश आहे.
 
फिफाने 2022 वर्ल्डकपसाठी 440 मिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड राशी वेगळी काढली आहे. अर्जेंटिनाने याआधी मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. तब्बल 36 वर्षांनंतर त्यांचं विश्वविजेतं होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.
 
जेतेपदाचा करंडक
विजयाचा जल्लोष झाल्यानंतर मायदेशी परतताना विजयी संघाला कांस्याचा पण सोन्याचा मुलामा दिलेला करंडक देण्यात येतो. तो दिसायला मूळ करंडकासारखा दिसतो पण प्रत्यक्षात वेगळा दिसतो. खऱ्या करंडकावर विजयी संघाचं नाव कोरण्यात येतं.
 
1974 पूर्वी विजयी संघाला खराखुरा करंडक तीन वर्ष मायदेशी ठेवण्याचा नियम फिफाने केला होता. विजयी करंडकाचं औपचारिक नाव ज्युलेस रमिटे वर्ल्डकप ट्रॉफी असं आहे. 1970 मध्ये ब्राझीलला हा करंडक ठेवण्याची अनुमती देण्यात आली. पण आता विजयी संघाला खरा करंडक मिळत नाही.
 
जुन्या काळी खराखुरा करंडक विशेषत: ज्युलेस रिमेट करंडक फुटबॉल संघटनांना देण्यात असे. पण आता मात्र प्रतिकृती देण्यात येते. या महत्त्वपूर्ण करंडकाची प्रतिष्ठा आणि सुरक्षा लक्षात घेऊन फिफाने धोरणात बदल केला. याला निमित्तही तसंच झालं कारण हा करंडक चोरीलाही गेला होता.
 
एकदा इंग्लंडमध्ये आणि नंतर एकदा ब्राझीलमध्ये हा करंडक चोरीला गेला होता. नशिबाने तो गवसला. पण याप्रकरणानंतर फिफाने जेत्या संघाला खराखुरा करंडक न देण्याचा निर्णय घेतला. फिफाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधल्या झुरित्च येथे आहे. याच मुख्यालयात फुटबॉल वर्ल्ड कपचा खराखुरा करंडक ठेवण्यात येतो. तिथेही अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत हा करंडक ठेवण्यात येतो. 24 तास या करंडकाभोवती सुरक्षारक्षकांचा वेढा असतो. हा करंडक चोरीला जाऊ नये, गहाळ होऊ नये, त्याचं नुकसान-झीज होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. काही विशिष्ट प्रसंगीच खराखुरा करंडक बाहेर काढला जातो. वर्ल्डकप फायनल्सचा ड्रॉ, वर्ल्डकपची पहिली आणि शेवटची अर्थात फायनलची लढत, फिफा वर्ल्डकप ट्रॉफी टूर या प्रसंगीच खराखुरा करंडक लोकांसमोर येतो.
 
या करंडकाचं वजन जवळपास 6.175 किलो एवढं आहे. ही ट्रॉफी तयार करण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा उपयोग करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटीमीटर एवढी आहे तर व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या खालच्या भागावर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तरीय आवरण देण्यात आलं आहे. 1994 साली ट्रॉफीत थोडा बदल झाला आणि विजेत्या संघाचं नाव खाली कोरण्यात येऊ लागलं.

Published By-  Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद 'दिलं', असं भाजपचे नेते वारंवार का म्हणताहेत?