Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Movie Review: संजू

Movie Review: संजू
, शुक्रवार, 29 जून 2018 (15:17 IST)
Movie Review: अडीच तासाच्या चित्रपटात संजय दत्तचे 37 वर्षांच्या लाइफला रणबीरने योग्यप्रकारे साकारले आहे  
Genre: बायोपिक
Director: राजकुमार हिरानी
 
क्रिटिक रेटिंग 3.5 /5
स्टार कास्ट रणबीर कपूर, दीया मिर्जा, परेश रावल, अनुष्का शर्मा, सोनम कपूर
डायरेक्टर राजकुमार हिरानी
प्रोड्यूसर विधु विनोद चोपड़ा
जोनर बायोपिक
ड्यूरेशन 161 मिनिट
 
'संजू'ची कथा - डायरेक्टर राजकुमार हिरानीचे चित्रपट 'संजू'ची कथा सुरू होते जेव्हा संजय दत्त (रणबीर कपूर)ला 5 वर्षांची सजा ऐकवण्यात येते. आपल्या जीवनावर पुस्तक लिहिण्यासाठी तो फ़ेमस रायटर विनी (अनुष्का शर्मा)ला भेटतो आणि आपली कथा सांगणे सुरू करतो. कथा काही अशी आहे की सुनील दत्त (परेश रावल) आणि नर्गिस (मनीषा कोइराला)चा मुलगा संजू, ज्याला चुकीची संगतीपासून बचाव करण्यासाठी पेरेंट्स बोर्डिंग शाळेत पाठवतात. नंतर त्याला ड्रग्सची लत लागते. संजू, आई वडिलांपासून बर्‍याच गोष्टी लपवतो. या दरम्यान नर्गिसची तब्येत खराब होते. संजू आपले डेब्यू चित्रपट 'रॉकी'ची शूटिंग करू लागतो. ड्रग्सपासून सुटकारा मिळवण्यासाठी रिहैब सेंटर जाणे, मुंबई बॉम्बं लास्टमध्ये नाव येणे आणि बर्‍याच वेळा जेल जाणे देखील चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय संजूच्या जीवनात काय काय घडले, कशा प्रकारे संजूचा मित्र कमलेश (विक्की कौशल), बायको मान्यता (दीया मिर्जा) त्याच्या सोबत उभे होते, का म्हणून संजुला ड्रग्स आणि बर्‍याच महिलांचा सहारा घ्यावा लागला असून बर्‍याच घटनांना व्यवस्थितपणे दाखवण्यात आले आहे. अडीच तासाच्या चित्रपटात संजय दत्तचे 37 वर्षांच्या लाईफला रणबीर कपूरने फारच योग्य प्रकारे साकारले आहे.  
webdunia
'संजू'चा रिव्यू- राजकुमार हिरानीचे चित्रपट 'संजू' रिलीज झाली आहे. चित्रपटात दोन मुख्य गोष्टी आहे एकतर रणबीर कपूरची दमदार ऍक्टींग आणि दुसरे संजय दत्ताची कॉन्ट्रोवर्शियल लाईफ. चित्रपटाच्या सुरुवातीतच ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की चित्रपट संजयच्या लाईफचे अर्धे सत्य आणि अर्धे खोटे आहे. अर्थात चित्रपटात गरजेनुसार भूमिका आणि त्यांचे नावं बदलले आहे. चित्रपटात हिरानी यांनी संजय दत्तची (टाडा केस सोडून) रियल लाईफ स्टोरीला पडद्यावर साकारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. स्क्रीनवर हिरानीने बर्‍याच जागेवर इमोशन्सला फारच योग्य पद्धतीने दाखविले आहे तर एखादं जागेवर निराश देखील केले आहे. रणबीर कपूरने चित्रपटात संजूची भूमिका फारच योग्य प्रकारे साकारली आहे. चित्रपट बघून असे वाटते की रणबीर-संजय एकच व्यक्ती आहे. चित्रपटात जेवढ्या एक्ट्रेसेस आहे, त्या फक्त शोपीस आहे. परेश रावल आणि मनीषा कोइरालाने आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे. चित्रपटात एक भूमिका आहे ज्याच्या परफॉर्मेंस रणबीर कपूरच्या बरोबरीने म्हणू शकतो तो आहे विक्की कौशल. इंटरवलच्या आधीपर्यंत संजयचे पूर्णपणे ड्रग्समध्ये डुबण्याची कथा दाखवण्यात आली आहे. अर्ध्या चित्रपटानंतर संजयची जेल जर्नी प्रेक्षकांना बांधून ठेवते. चित्रपट जरूर बघावे कारण यात एका स्टारच्या लाईफचे पूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे तसेच रणबीर कपूरने संजूच्या भूमिका फारच योग्य प्रकारे स्क्रीनवर साकारले आहे. रणबीर प्रेक्षकांना हसवतो तसाच रडवतो देखील आहे. जिम सरभची भूमिका फार वेगळी आहे, ज्याच्याशी तुम्ही फक्त द्वेषच कराल. तो संजयचा पहिला मित्र जुबिन मिस्त्रीच्या भूमिकेत आहे. जुबिनच होता, ज्याने संजयला ड्रग्स आणि दारूची सवय लावली होती. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन आणि चित्रपटाचे संगीत, स्क्रीनप्लेसोबतच येतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाझने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा