Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परदेशातील शिक्षणासाठी बॅंकेचे कर्ज

परदेशातील शिक्षणासाठी बॅंकेचे कर्ज
WDWD
परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा असते. परंतु, हे स्वप्न फार थोड्या विद्यार्थ्यांना पूर्ण करता येते. एवढा पैसा आणयचा कुठून? हा प्रश्न बहुतेक विद्यार्थी व पालक यांच्यासमोर निर्माण होतो. परदेशात जाण्यासाठी व्हिसा काढणे महत्त्वाचे असते. त्यासाठीही प्रचंड पैसा लागतो. विद्यार्थी व पालकांना भेडसावणारा पैशाचा प्रश्न आता भारतातील बॅंका सोडवत आहेत. परदेशातील शिक्षणासाठी आता बॅंका माफक व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. असे झाल्याने मध्यम वर्गातील विद्यार्थ्यासाठी भारतीय बॅंकानी परदेशात जाण्याचा उत्तम मार्ग शोधून काढला आहे.

परदेशात शिक्षण घेण्यासाठी दोन प्रकारचे खर्च येतात. ते म्हणजे अभ्यासक्रमाचे शुल्क व तेथे राहण्यासाठी लागणारा पैसा. बॅंकेत कर्ज प्रकरण करताना कोर्सची फ‍ी, परदेशात जाण्या-येण्याचा विमान खर्च, राहण्याचा खर्च तसेच आरोग्य विमा व दररोजच्या गरजांवर होणारा खर्च यांचे सविस्तर तपशील द्यावे लागतात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च साधारण 10 ते 15 लाख रूपये एवढा असतो. एवढा प्रचंड खर्च येत असूनही परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बॅंकाकडून सुलभ हप्त्यांनी मिळणारे कर्ज होय. होतकरू विद्यार्थी अशा प्रकारचे कर्ज घेऊन पालकांचा भार कमी करत असतात.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया अशा सर्व राष्ट्रीयकृत बॅंका परदेशातील शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देतात. तसेच खाजगी क्षेत्रातील एचडीएफसीसारखी मोठी बॅंकही कर्ज देत आहे.

बहुतेक सर्व पदवी, पदव्यूत्तर पदवी व पीएचडी तसेच इतर अभ्यासक्रमासाठी कर्ज उपलब्ध होत असते. काही बॅंका केवळ व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना कर्ज देत असतात. 50 हजार ते 15 लाखापर्यंत कर्ज बॅंकाकडून सुलभतेने उपलब्ध होते.

मध्यम वर्गातील होतकरू विद्यार्थीचे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न कर्ज उपलब्ध करून देणार्‍या बॅंका पूर्ण करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi