Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असुर गुरु "शुक्राचार्य"

guru shukracharya
जर आपण गुरु पोर्णिमेबद्दल बोलायला गेलो तर आपल्याला द्रोणाचार्य, चाणक्य, संत रामदास यांच्यासारखे अनेक गुरुजनांचं समरण होतं, पण तुम्हाला हे माहित आहे का की असुर गुरु शुक्राचार्य हे ही खुप मोठे गुरु होते आणि यांनी अनेक शिष्यांना शिक्षा दिली आहे जे असुर नव्हते. चला जाणून घेऊ या शुक्राचार्य यांच्याबद्दल.
 
कोण होते शुक्राचार्य?
शुक्र ज्यांना शुक्राचार्य आणि असुराचार्य ही म्हणतात ऋषी भृगु (सप्तऋषींपैकी एक) आणि काव्यमंतांचे (ख्याती माता) पुत्र होते. सौरमंडळात असणार्‍या नवगृहांपैकी एक 'शुक्र' हे देखील आहेत.
 
का झाले शुक्राचार्य असुरांचे गुरु 'असुराचार्य' ?
देव गुरु बृहस्पती आणि असुर गुरु शुक्राचार्य दोघांचे एकच गुरु होते ते म्हणजे महर्षी अंगिरा. एका बुद्धिमान आणि निपुण शिष्य असूनही महर्षी अंगिरा बृहस्पतींवर अधिक लक्ष देत असे ज्यामुळे ते देवगुरु बनवले गेले आणि याहून क्रोधित होऊन शुक्राचार्यांनी असुरांचे गुरु होऊन त्यांचे नेतृत्व करायचं ठरवलं.
 
देवासूर संग्रामाच्या काळात नेहमी हरल्यानंतर त्यांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी महादेवांची तपस्या करून 'संजीवनी मंत्र' वरदान स्वरूप घेतले ज्याने ते मृत असुरांना पुन्हा जिवंत करू शकत असे. अशा प्रकारे ते शक्तिमान असुरांचे आचार्य झाले. त्यांच्यासोबत झालेल्या पक्षपातामुळे बृहस्पतींना देव गुरु स्थान मिळाले आणि शुक्राचार्य हे असुर गुरु झाले.
 
शुक्राचार्य: एक खरे गुरु ?
असुर गुरु शुक्राचार्यंनी कधीही त्यांच्या कोणत्याही शिष्यांसोबत पक्षपात केला नाही, त्यांच्यासाठी असुरराज बलि असो किंवा कच (बृहस्पतींचे पुत्र) सगळे सामान होते. एका काहाणीनुसार देव गुरु बृहस्पतींनी स्वतःचे पुत्र कच, ह्याला शिक्षा घेण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले होते. शुक्राचार्यंनी कचला आपले  शिष्य म्हणून स्वीकारले, हा निर्णय त्यांनी असुरांविरुद्ध जाऊन घेतला. असुरांनी कचला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांनी आपले संजीवनी मंत्राने कचला जिवंत केले. एकदा असुरांनी कचचा वध करून त्याच्या हाडांचे चूर्ण करून मदिरामध्ये मिसळून स्वतः शुक्राचार्यांना प्यायला दिले. नंतर कचला हाक दिल्यावर त्यांच्या पोटामधून आवाज आली तेव्हा त्यांना सगळं प्रकरण समजलं आणि त्यांनी संजीवनी मंत्राने परत कचला जीवन दान दिले. तेव्हा कच शुक्राचार्यांचे पोट चिरून बाहेर आला आणि तोपर्यंत तो ही संजीवनी मंत्र शिकून गेला होता. कचने नंतर शुक्राचार्यांना जिवंत केले आणि शिष्य धर्म पूर्ण केला.
 
भीष्म पितामह यांनी पण काही विषयांमध्ये शुक्राचार्यांशी शिक्षा घेतली होती. विष्णू भक्त प्रह्लाद ते पण शुक्राचार्यांचे शिष्य होते. ह्यानी आपल्याला हे कळतं की शुक्राचार्य हे एक निष्पक्ष गुणवान आणि चतुर गुरु होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महालक्ष्मी आरती मराठी Mahalaxmi Aarti