Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भोजशाळा आणि वसंतोत्सव

भोजशाळा आणि वसंतोत्सव

वेबदुनिया

मध्य प्रदेशातील धार हे ऐतिहासिक शहर आहे. येथे फार प्राचीन भोजशाळा आहे. ती राजा भोज याच्या काळातील आहे. येथे वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघ महिण्यातील पंचमीला येथे सरस्वतीचे उपासक यात्रेचे आयोजन केले जाते. धारसह मध्य प्रदेशातील भाविक याठिकाणी सरस्वती मातेची या दिवशी पूजा-अर्चा करता‍‍त.
 
राजा भोज हे सरस्वती देवीचे उपासक होते. त्यांच्या काळी सरस्वती देवीच्या साधनेला विशेष महत्त्व होते. त्या काळात सामान्य लोकही संस्कृतचे विद्वान असायचे. त्यामुळे त्याकाळी धार हे संस्कृत आणि संस्कृती यांचे केंद्रबिंदू होते. राजा भोज, सरस्वतीच्या कृपेने योग, न्याय, ज्योतिष, धर्म, वास्तुशास्त्र, राज्य-व्यवहार शास्त्र यासारख्या बर्‍याच शास्त्रात पारंगत होते. 
 
भोजशाळा एका खुल्या मैदानात बांधली आहे. भोजशाळेच्या समोर एक मुख्य मंडप आणि मागच्या बाजूला एक मोठे प्रार्थना घर आहे. येथे वसंत पंचमीला भव्य यात्रा भरते. येथे होणार्‍या यज्ञवेदीत पडणारी आहुती आणि अन्य अनुष्ठाने पूर्वीच्या वैभवाची आठवण होते. नक्षीदार स्तंभ तसेच प्रार्थनागृहाचे नक्षीदार छत भोजशाळेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दोन मोठे शिलालेख आहेत. या शिलालेखांवर संस्कृतात नाटक कोरलेले आहे. हे अर्जुन वर्माच्या काळात कोरलेले आहे. 
 
या काव्यबध्द नाटकाची रचना राजगुरू मदन यांनी केली होती. ते विख्यात जैन विद्वान आशाधर यांचे शिष्य होते. या नाटकाचा नायक पूरंमंजरी आहे. हे नाटक धारच्या वसंतोत्सवात अभिनित करण्यासाठी लिहिले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विदर्भाचे पंढरपूर शेगाव