Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे करा होलिकापूजन

असे करा होलिकापूजन
फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या.

* होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.
* प्रत्येक जम झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते.
* नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात.
* गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात.
* त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते.
* वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपारीक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे...

अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।
अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्‌ ॥

* पूजनानंतर होळी दहन केले जाते.
* दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो.
* होळी दहनानंतर जी राख उरते. तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे.
* राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे...

वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥

होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi