Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रंगात रंगलेले चित्रपट

- समय ताम्रकर

रंगात रंगलेले चित्रपट
ND
रंग हा उत्साह आणि आनंदाचा पर्याय म्हणून ओळखला जातो. म्हणूनच रंगाच्या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या चित्रपटांनीही हे वातावरण टिपले नसते तरच नवल. पण आम्ही इथे चित्रपटातील होळीपेक्षा चित्रपटांच्या नावातला रंग टिपणार आहोत. रंगांचे आणि बॉलीवूडचे नाते किती घट्ट आहे, हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

होळीला गुलाल आणि लाल रंगाचा सर्वांत जास्त वापर केला जातो. म्हणून सुरवात या रंगापासूनच करू या. काही चित्रपट लाल रंगांची वापरांनी 'लालेलाल' झाले आहेत. लाल बंगला (1966), लाल किला (1961), लाल पत्थर (1972) आणि लाल हवेली (1944) या चित्रपटांची नावे वाचली किंवा उच्चारली तरी त्यात काही रहस्यमय वाटू लागते. हा या रंगांचा प्रभाव. लाल दुपट्टा (1948) आणि लाल चुनरीया (1983) या चित्रपटात लाल शब्दाचा उपयोग प्रणयासाठी केला आहे.

पण काही लाल या शब्दांचा वापर केलेली चित्रपटांची नावेही हटके आहेत. उदा. लाल बादशाह (1999), लाल चिठ्‍ठी (1935) आणि लाल चीता (1935). रानी और लाल परी (1975), लाल परी (1954) आणि लाल बुझक्कड (1938). याशिवाय लाल सलाम (2002), काली टोपी लाल रुमाल (1959) आणि लाल बत्ती (1957) या सारखे चित्रपट देखील प्रदर्शित झाले असून त्यांचे नाव लाल आहे.

काही लोकांनी लाल हा शब्द न वापरता त्याची आंग्ल आवृत्ती घेतली आहे. त्यामुळेच या चित्रपटांची नावे ‘रेड रोज’ (1980), ‘रेड सिग्नल’ (1941), रेड स्वस्तिक (2007) आणि ‘रेड’ (2007) आहेत.

होळीच्यावेळी निळ्या रंगाचा वापर तुलनेने कमी केला जातो. कदाचित म्हणूनच की काय चित्रपटातही ही नावे कमीच आहेत. ‘ब्लू’ नावाचा चित्रपट येणार येणार म्हणून अजून येतो आहे. पण ब्लू अम्ब्रेला (2004) आणि हैद्राबाद ब्लूज (1998) हे चित्रपट येऊन गेले आहेत. नीला आकाश (1965) आणि नीला (1935) या नावाचे चित्रपटही पहायला मिळाले आहेत.

काही लोक काळ्या रंगाला अशुभ मानतात, पण बॉलीवूडमध्ये हा रंग 'पॉप्युलर' आहे. या रंगाच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. काळा किंवा ब्लॅक शब्द जोडल्यावर कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलला जातो. एका निर्मात्याने तर समुद्रच काळा केला आणि चित्रपटाचे नाव काला समुंदर असे ठेवले (1962), तर कोणाला डोंगर काळा दिसला म्हणून त्यांनी काला पर्वत (1971) नावाचा चित्रपट तयार केला.

काला घोडा (1963), काला सोना (1975), काला आदमी (1978), काला पत्थर (1979), काला पानी (1958, 1980), काला धंदा गोरे लोग (1986), काला बाजार (1960, 1989), काला कोट (1993), काला सच (1995), सजा-ए-काला पानी (1996), काला चोर (1956), काला आदमी (1978), गोरा आणि काला (1972), दाल में काला (1964) आणि काला चष्मा (1962) या नावाचे चित्रपट येऊन गेले आहेत.

काळेपणा आंग्लभाषेतून व्यक्त करणारी ब्लॅक शब्दाचाही वापर बराच झाला आहे. ब्लॅक बॉक्स (1936), ब्लॅक आउट (1942), ब्लॅक कॅट (1959), ब्लॅकमेलर (1959), ब्लॅक रायडर, ब्लॅक टायगर (1960), ब्लॅक शेडो (1963), ब्लॅक ऐरो (1969), ब्लॅकमेल (1973, 2005) ब्लॅक (2005), ब्लॅक फ्रायडे (2007) अशा प्रकारे अनेक चित्रपटात ब्लॅक शब्दाचा प्रभाव वाढविण्यासाठी उपयोग केला गेला. एका निर्मात्याने बिपाशाच्या नावावरच चित्रपट तयार केला- बिपाशा द ब्लॅक ब्यूटी (2006).

ाळा रंग अंधाराचे प्रतीक आहे. तर पांढरा रंग उजेडाचे. म्हणून काही निर्मात्यांनी या दोन्ही रंगाच्या नावांचा बरोबर उपयोग केला. नुकताच सुभाष घईचा ‘ब्लॅक एंड व्हाइट’ प्रदर्शित झाला आहे. मि. ब्लॅक मि. व्हाइट आणि द ब्लॅक एंड व्हाइट फॅक्ट सारखे चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत.

पांढर्‍या रंगावर ‘श्वेत : द व्हाइट रेनबो’ (2005), व्हाइट नॉइज (2005) प्रदर्शित झाले आहेत. 1977 मध्ये सफेद शब्दाची दोन चित्रपट निर्माण झाली होती. ‘सफेद झूठ’ आणि ‘सफेद हाथी’. सफेद सवार 1941 मध्ये पहायला मिळाला.

गुलाबी (1966) आणि गाल गुलाबी नैन शराबी (1974) नावाच्या दोन चित्रपटात गुलाबी रंग दाखविला आहे. रंगानेच सर्व रंगाचा आभास होतो. त्यामुळे चित्रपटाच्या नावात रंग शब्द खूप दिसून येतो. रंग शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत. उदाहरणार्थ, देशभक्तीचा रंग, रंग दे बसंती (2006) आणि तिरंगा (1993) मध्ये दाखविले आहे.

कोणाला तरी जग मतलबी दिसले म्हणून त्याने चित्रपटाचे नाव 'दो रंगी दुनिया (1933)' ठेवले तर कुणाला जग चांगले वाटले म्हणून त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव रंगीन जमाना (1948) असे ठेवले.

ऐश करणार्‍या रंगीला व्यक्तींनाही चित्रपटांच्या नावातून हायलाईट करण्यात आले आहे. म्हणून रंगीला राजपूत (1933), रंगीला नवाब (1935), रंगीला मजदूर (1938), रंगीला जवान (1940), रंगीले दोस्त (1944), रंगीला मुसाफिर (1950), रंगीला (1952, 1995), रंगीला राजा (1960) रंगीला रतन (1976), रंगीन राते (1956) आणि रंगीन कहानी (1947) हे चित्रपट येऊन गेले.

रंग शब्दाचे अनेक रंग चित्रपटांच्या नावातून दिसले. अपने रंग हजार (1975) आणि रंगबाज (1996) नावाचे चित्रपटही आले. एक्शन आणि सामाजिक चित्रपटाच्या नावातही रंग आला. जसे लहू के दो रंग (1997, 1979), कुरबानी रंग लाएगी (1991), मेहंदी रंग लाएगी (1982) आणि ये खून रंग लाएगा (1970). याशिवाय सात रंग के सपने (1998), रंग (1993), रंग बिरंगी (1983), रुत रंगीली आई (1972), रंगोली (1962), नवरंग (1959), रंगीला राजस्थान (1949) आणि रंग महल (1948) मध्येही रंग पसरला.

होळीचा सण असल्यामुळे होळीच्या नावाच्या चित्रपटाचा विचार केला जायला हवा. होली (1940, 1984), होली आई रे (1970), सिंदूर की होली (1996) नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कर्मा, कंफेशन एंड होली प्रदर्शित होणार आहेत.

आपणाला रंगावर आधारीत चित्रपटांची आणखी काही नावे माहित असल्यास आम्हाला जरूर कळवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi