Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण पाकिस्तानच दहशतवाद्यांचा अड्डा

संपूर्ण पाकिस्तानच दहशतवाद्यांचा अड्डा
NDND
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसंदिवस बिघडत आहेत. पाककडून दहशतवाद्यांवर कारवाई होत नसल्याने भारताची सहनशीलता संपत आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताने कारवाई केल्यास संपूर्ण पाकिस्तानावरच कारवाई करावी लागणार आहे. कारण दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे पाकमध्ये सर्वत्र पसरलेली आहेत.

लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे पाकिस्तानात सर्वत्र आहेत. एकूण 2200 ठिकाणी ही केंद्रे आहेत. यामुळे जर भारताने अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याची योजना तयार केली तर संपूर्ण पाकिस्तानातच कारवाई करावी लागणार आहे.

* लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षण केंद्रे संपूर्ण पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत.

* लष्करचे भरती केंद्र व कार्यालय पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद, रावलपिंडी, कराची, मुल्तान या शहरांत आहे.

* पाकिस्तानमधील अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे : बरहाली, गुज्जरखान, झांग, कोहाट, मिराम शाह, मशेरा, ओझोरी, सिक्यारी, मुझफ्फराबाद, चकोठी, बाग, अलियाबाग, मरी, रावलकोट, पलंद्री, कहूटा, कोटली, झेलम, भिंबर, शकरगढ़ आदी.

* पाकव्याप्त कश्मीरमध्ये दधनियाल, गोजरा फोर्ट, गढ़ी दुपट्टा, निकियाल, सेन्सा आणि तेजिया.

पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या 11 दहशतवादी संघटना:
लष्कर-ए-उमर, सिपाह-ए-सहाबा, तेहरीक-ए-जफरिया, तेहरीक-ए-नफज-ए-शरीयत-ए-मोहम्मदी, लश्कर-ए-जंगवी, सिपाह-ए-मोहम्मद पाकिस्तान, जमात उल फुकरा, नदीम-ए-कमांडो, पापुलर फ्रंट फॉर आर्म्ड रेजिस्टंस, मुस्लिम युनायटेड आर्मी, हरकत उल मुजाहिदीन अल अलामी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना:
पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या प्रमुख 32 संघटना आहेत. या संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय आहेत.

* हिजबुल मुजाहिदीन, हरकत उल अन्सारी जी सध्या हरकत उल मुजाहिदीन नावाने ओळखली जाते. त्याचबरोबर लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद किंवा मुजाहिदीन-ए-तंजीम, अल बद्र, जमात-ए-मुजाहिदीन, लश्कर-अ-जब्बार, हरकत उल जेहाद अल इस्लामी, मुत्ताहेदा जेहाद काउंसिल, तेहरीक उल मुजाहिदीन, अल उमर मुजाहिदीन, मुस्लिम जाबाज फोर्स, काश्मीर जेहाद फोर्स, जम्मू एन्ड कश्मीर स्टुंडटस लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटना कार्यरत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi