Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केक आहे की नोटा छापण्याची मशीन !

केक आहे की नोटा छापण्याची मशीन !
आज केवळ कपडे आणि कार नव्हे तर केकदेखील डिझायनर मिळतात. बाजारात एकापेक्षा एक फ्लेवर्ड आणि डिझायनर केक तयार केल्या जातात. केवळ आपल्या नेमके काय हवं आहे ते सांगायचं असतं, मग ते किती जरी विचित्र असलं तरी तज्ज्ञ आपल्या आवडीप्रमाणे केक तयार करून देतात. केवळ सामान्य केकच्या तुलनेत या केक साठी आपल्या अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.
 
तसेच अलीकडे एक असा केक तयार करण्यात आला ज्यातून पैसे निघतात. या केकवर असलेल्या एका बटणाला दाबल्याने त्यातून पैसे बाहेर पडू लागतात. एका सुनेने आपल्या सासूसाठी ही खास केक तयार करवली.
 
शांगडोंग प्रांताच्या किंगदाओ येथील रहिवासी सून आपल्या सासूला काही वेगळं गिफ्ट देऊ इच्छित होती. कपडे आणि ज्वेलरी सारख्या बोरिंग गिफ्टहून काही वेगळं देण्याच्या तिच्या विचाराने हा केक तयार झाला. ही केक तयार करताना एका ट्रेमध्ये काही नोटा स्प्रिंगच्या मदतीने दाबून ठेवण्यात आल्या. आयसिंगकरून वरून त्या नोटा लपवण्यात आल्या. केकच्या टॉपवर बटण ठेवण्यात आले, जसेच या बटणाला प्रेस केले त्यातून नोटा बाहेर पडत होत्या. अशी केक मिळाल्यावर कोण खूश होणार नाही. तर आता ही केक बघून आपल्याला अशी केक गिफ्ट म्हणून मिळावी अशी इच्छा आपल्यालाही नक्कीच होत असेल... नाही का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावरगाव: आई रमाई उद्यानाचे लोकार्पण