Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुसळधार पावसामुळे दुबई तुंबली

rain red umbrella
, बुधवार, 17 एप्रिल 2024 (14:14 IST)
16 एप्रिलला मुसळधार पावसामुळे संयुक्त अरब व जवळच्या देशांमध्ये खूप मुसळधार पाऊस झाला. पावसाची तीव्रता एवढी होती की काही मिनिटांमध्ये मोठया प्रमाणात पाणी भरून पुर्नजन्य स्थिती निर्माण झाली. तसेच प्रमुख महामार्ग हे जलमय होऊन रस्त्यावरील वाहने, वस्तू या चक्क पाण्यात बुडाल्यात तर काही वाहने वाहून गेलेत. 
 
दुबईमध्ये पावसाचे हे रुद्र पाहता यूएई प्रशासनाने नागरिकांना काळजी घ्या व घरात थांबा अशी विनंती केली असून ऑनलाईन शाळा भरवण्यात आल्या. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करावे अश्या सूचना दिल्यात. वाळवंटात दुबई हे शहर वसलेले आहे. तसेच येथील तंत्रज्ञान हे सर्वांना आश्चर्यचकित करते. काल झालेल्या पावसामुळे दुबई पाण्यात होती. 
 
तसेच मॉल, बाजारपेठ, स्टेशन, विमानतळ, ऑफिस, रस्ते सर्वदूर पाणी भरले होते. दुबईमध्ये 160 मिमी पाऊस झाला जो कमीतकमी दोन वर्षात होतो. म्हणून ही एक नैसर्गिक मोठी आपत्ती घोषित करण्यात आली आहे. तसेच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी भरल्यामुळे  अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच 25 मिनिटे (DXB) संचालन थांबवण्यास सांगितले. तसेच शास्त्रज्ञांच्या मते, कृत्रिम पावसामुळे हे घडले असावे, क्लाउड सीडिंगसाठी विमाने  दुबई प्रशासनाने उडवली होती. त्यामुळे हे घडले असावे असे मत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट