Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Israel: लेबनॉनमधून इस्रायलवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागले

israel hamas war
, बुधवार, 6 मार्च 2024 (10:07 IST)
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमधील युद्धविरामाचे प्रयत्न सातत्याने अपयशी ठरले आहेत. दरम्यान, इस्रायलला गाझा पट्टीतील हमास तसेच लेबनॉनकडून हिजबुल्लाह यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी अशाच एका हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दोन भारतीयही जखमी झाले आहेत. हा हल्ला लेबनॉनमधून झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधून डागण्यात आलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र इस्रायलच्या उत्तर सीमेजवळील मार्गालिओट येथील एका बागेवर आदळले. यामुळे केरळमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणखी दोघे जखमी केरळचे आहेत. याशिवाय आणखी काही लोक जखमी झाले आहेत.
 
इस्रायलच्या बचाव सेवेचे प्रवक्ते माझेन डेव्हिड अडोम यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 11 वाजता गॅलील भागातील मार्गालियटच्या बागेत ही घटना घडली. यामध्ये केरळमधील कोल्लम येथील रहिवासी असलेल्या पटनीबेन मॅक्सवेल यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचा मृतदेह जिवा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. 
 
पॉल मेलविन या जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून त्याला इस्रायली शहरातील सफेद येथील झिव्ह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तो केरळच्या इडुक्की जिल्ह्यातून आला आहे
 
इस्त्रायली दूतावासाने X वर पोस्ट करून भारतीयांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यात म्हटले आहे की, "इस्रायलमधील मार्गालियट येथील एका बागेत शिया दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने केलेल्या भ्याड हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू आणि जखमी झाल्याने आम्हाला धक्का बसला आहे. इस्रायलच्या वैद्यकीय संस्था जखमींची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत." आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे."या हल्ल्यामागे इराण समर्थित शिया संघटना हिजबुल्लाचा हात असल्याचे मानले जात आहे.

Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia -ukraine War : युक्रेनच्या ड्रोनने केला रशियन जहाजावर हल्ला,युद्धनौका पाण्यात बुडाली