Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युके : केएफसीची साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद

युके : केएफसीची साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद
, मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:11 IST)

युकेमधली केएफसीची ९०० पैकी साडेपाचशेहून अधिक आऊटलेट्स बंद पडली आहेत. कारण फ्राईड चिकन किंवा अन्य कोणत्याही पदार्थांसाठी चिकन उपलब्ध नसल्यानं जोपर्यंत चिकनचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ही आउटलेट्स बंदच राहणार आहेत. तर उर्वरित जी आउटलेट्स आहेत ती दिवसभर सुरु न ठेवता फक्त काही तासांपुरताच सुरू ठेवण्यात येण्याचा निर्णय केएफसीनं घेतला आहे. तसेच केएफसीनं मेन्यूतही कपात केली आहे. केएफसीनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. 

केएफसीनं काहीमहिन्यांपूर्वी डीएचएलची डिलिव्हरी पार्टनर म्हणून निवड केली. पण युकेमधल्या सर्वच आउटलेट्समध्ये चिकनचा पुरवठा करण्यापासून डिएचएलला अपयश आलं असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामुळे केएफसीच्या युकेमधील शेकडो आउटलेट्समध्ये चिकन वेळेवर पोहोचू शकलं नाही.  म्हणूनच कंपनीनं ट्विट करत ५६० हून अधिक आउटलेट्स काही काळासाठी बंद करत असल्याची औपचारिक माहिती दिली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पासपोर्ट काढणे झाले सोपे, नियमांमध्ये झाला बदल