Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KFC मध्ये जेवल्यानंतर 200 लोकं रुग्णालयात दाखल, सर्व रेस्टॉरंट बंद

KFC मध्ये जेवल्यानंतर 200 लोकं रुग्णालयात दाखल, सर्व रेस्टॉरंट बंद
उलानबटोर- मंगोलियामध्ये केएफसी (KFC)च्या रेस्टॉरंटमध्ये जेवणारे 200 हून अधिक लोकं रुग्णालयात पोहचल्यानंतर अधिकार्‍यांनी देशातील राजधानीमध्ये केएफसीचे सर्व रेस्टॉरंट तात्पुरते बंद केले आहे.
 
पहिले प्रकरण या महिनाच्या सुरुवातीला आले होते जेव्हा कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये कोंबडीचे भाजलेले मांस खाल्ल्यामुळे 16 लोकांमध्ये अतिसार, उलट्या आणि तपासह इतर विषबाधांचे लक्षण पाहिले गेले.
 
उलानबटोरच्या महानगर व्यावसायिक तपास विभागाने सांगितले की असे 247 प्रकरणांची रिपोर्ट केली गेली आहे आणि 42 लोकांना रुग्णालयात भरती केले गेले आहे. विभागाने देशातील राजधानीमध्ये स्थित केएफसीचे सर्व 11 रेस्टॉरंट बंद करण्याच निर्णय घेतला आहे आणि अशा प्रकरणांची तपासणी केली जात आहे.
 
प्रारंभिक तपासणी उघडकीस आले की रेस्टॉरंटमध्ये 35 कर्मचार्‍यांनी जेवण तयार करण्यापूर्वी मांस योग्य रित्या तपासले नाही. यातून अधिकश्या चिकित्सकीय परीक्षण रिपोर्ट रिकामी आहे, जे बेकायदेशीर आहे. रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता प्रबंधाचा देखील अभाव आहे.
 
रेस्टॉरंटमध्ये पाण्यात क्लेबसीला एसपीपी नामक बॅक्टेरिया आढळून आले आहे. सोडा मशीनमध्ये इ-कोलाई बॅक्टेरियाचे असल्याचे तपासणीत कळून आले आणि 4 लोकं शिगेला जिवाणूंच्या संपर्कात आले आहे. ज्यामुळे केएफसी कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्यामुळे ग्राहकांना अतिसार आणि ताप झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर