Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Facebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक

Facebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक
दुनियेत फेसबुक सर्वात अधिक वापरण्यात येणारा सोशल मीडिया मीडियम आहे. पर्सनल मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मदतीने लोकं व्यवसाय, कंपनीचे प्रमोशन, अनेक प्रकाराचे कँपन चालवत आहे. परंतू आपल्याला हे माहीत आहे का आपल्या लहानश्या चुकीमुळे फेसबुकवरील आपलं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. 
 
तर जाणून घ्या कोणत्या चुका करू नये- 
 
आपण अपमानकारक सामुग्री पोस्ट किंवा शेअर करत असाल तर ब्लॉक होऊ शकता.
 
फेसबुकवर 200 हून अधिक ग्रुप ज्वाइन करत असला तरी ब्लॉक होऊ शकता. कारण फेसबुक यूजरला 200 हून अधिक ग्रुप ज्वाइन करण्याची परवानगी देत नाही.
 
फेसबुक ब्लॉक पॉलिसी प्रमाणे एकाच वेळी अधिक लोकांना मेसेज करत असाल फेसबुक मेसेज अनवेलकम करतं आणि यामुळे अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.
 
आपण एखाद्या यूजरला परेशान करत असाल आणि यूजरने याची तक्रार फेसबुककडे केल्यास ब्लॉक होऊ शकता.
 
कोणत्याही ग्रुपमध्ये विशेषतः कम्युनिटी ग्रुपमध्ये चूक, उपद्रवी पोस्ट करू नये.
 
कोणत्याही धर्म किंवा समुदायाप्रती टिप्पणी किंवा विरोधात पोस्ट करणे महागात पडेल.
 
तसेच कोणत्याही घटनेप्रती लोकं उत्तेजित होतील अशातही ब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेस्बियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार