Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शोधा, मोबाईलचे जुने कॉल डिटेल्स

शोधा, मोबाईलचे जुने कॉल डिटेल्स
, सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:13 IST)

आता मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर ही प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे. आता mubble app नावाच्या अ‍ॅपमुळे जुने कॉल डिटेल्स शोधणे सहज शक्य होणार आहे. तुम्हाला 7-30 दिवस जुने कॉल डिटेल्स mubble app  या अ‍ॅपमुळे शोधणे शक्य होणार असून ते पीडीएफ फाईलच्या स्वरूपात मिळतील. जो इमेल आयडी अ‍ॅपमध्ये द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अवघ्या दोन मिनिटांत परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील.

हे अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर ज्या क्रमाकांचे तुम्हाला कॉल डिटेल्स हवेत तो नंबर एन्टर करा. काही प्रायव्हसी डिटेल्स घेतल्यानंतर त्यामध्ये तारीख, क्रमांक, कॉल ड्युरेशन यासारखे डिटेल्स दिले जातात. त्यामुळे युजर्सना 7-30 दिवसांपर्यतचे कॉल डिटेल्स मिळतात.

mubble app नावाचे हे फ्री अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप असून 4.49 एमबीच्या अ‍ॅपला Recharge Plans 038; Prepaid Bill या नावानेही ओळखले जाते. 4.2 पेक्षा अधिकच्या अ‍ॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काम करते. अ‍ॅप डेव्हलपरच्या दाव्यानुसार एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल, एअरसेल, रिलायन्स जिओ, डोकोमोशिवाय इतरही टेलिकॉम कंपन्याच्या क्रमांकांचे डिटेल्स काढले जाऊ शकतात.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परत एकदा ग्रेट इंडियन सेल, एचडीएफसी ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक