Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेझॉन इंडियावर अॅश-ट्रेमुळे वाद, अखेर प्रॉडक्ट काढले

अमेझॉन इंडियावर अॅश-ट्रेमुळे वाद, अखेर प्रॉडक्ट काढले
, बुधवार, 7 जून 2017 (11:38 IST)

अमेझॉन इंडिया पुन्हा एकदा अॅश-ट्रेमुळे वाद निर्माण झाला आहे. या अॅश-ट्रेचं डिझाईन आक्षेपार्ह आणि अश्लिल आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं अॅश-ट्रे आहे. या वादानंतर अमेझॉनने अॅश-ट्रे वेबसाईटवरुन हटवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला  आहे. सदरच्या  मेटल अॅश-ट्रेची किंमत 4 हजार 441 रुपये आणि चिनी मातीपासून बनलेल्या अॅश-ट्रेची किंमत 299 रुपये असल्याचे अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर सांगण्यात आले होते. हे प्रॉडक्ट अमेझॉनच्या वेबसाईटवर पाहताच सोशल मीडियावरुन आक्षेप घेण्यात आला आणि प्रॉडक्टवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली.फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसह सर्वच सोशल मीडियावरुन अमेझॉन इंडियावर तुफान टीका सुरु झाली. त्यानंतर अमेझॉनने तातडीने अॅश-ट्रेचे हे वादग्रस्त प्रॉडक्ट वेबसाईटवरुन हटवले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक्क बकरीने 66 हजार रुपये गिळले