Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅपमधील हे नवे फिचर अॅडमिनच्या हातात पूर्ण सत्ता

व्हॉट्सअॅपमधील हे नवे फिचर अॅडमिनच्या हातात पूर्ण सत्ता
, शुक्रवार, 11 मे 2018 (15:06 IST)
व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये पडणारा मेसेजचा पाऊस कधी-कधी नकोसा होतो रे, कुणीही काहीही टाकत असतं आणि त्यावर बिनकामाची चर्चा सुरू होते, त्यामुळे   अनेकदा चुकीच्या गोष्टी पसरतात, दंगे होता. इतकेच काय तर खून देखील झाले आहेत. मात्र यावर आता पूर्ण लगाम बसणार आहे. व्हॉट्स अॅपचं नवं फीचर आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप लवकरच 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' नावाचं फीचर लवकरच सुरु करणार आहे. फीचरमुळे फक्त ग्रूप अॅडमिनलाच ग्रूपमध्ये परवानगीविना मेसेज पाठवता येईल. इतर सर्व सदस्यांना मेसेज, फोटो, व्हिडिओ, जिफ, डॉक्युमेंट किंवा व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी अॅडमिनची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे   होणारा ताप कमी होणार आहे. 2.18.132 या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये 'अॅडमिन सेटिंग्स' नावाचा पर्याय ग्रूप इन्फोमध्ये समाविष्ट केला जाईल. तिथून ग्रूप अॅडमिन सदस्यांना 'रिस्ट्रिक्ट' करू शकणार आहे. म्हणजेच ग्रुपचा मुखिया ठरवेल की कोणी पोस्ट करायचे कोणी पोस्ट करायचे नाही. जाती-धर्मांत तेढ निर्माण होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढलाय. हे सगळं 'रिस्ट्रिक्ट' करण्यासाठी 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' फीचर फायद्याचं   ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनी केली आत्महत्या