जयपूरमध्ये १४ आणि १५ जुलैला इंटरनेट सेवा बंद

गुरूवार, 12 जुलै 2018 (08:40 IST)
अनेकदा इंटरनेटचा वापर परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी केला जात आहे. यामुळे कॉपीचे हे गैरप्रकार रोखण्यासाठी जयपूरमध्ये दोन दिवसइंटरनेटसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. १४ व १५ जुलैला जयपूरमध्ये पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापासून ५ किलोमीटर पर्यंतच्या परीसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे. १४ आणि १५ जुलै या दोन दिवशी इंटरनेट सेवा  बंद राहणार आहे. दरम्यान, पोलीस भरती परीक्षेत कॉपीचे गैर प्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेतली जाणार आहे.   
 
पोलीस मुख्यालयाने ऑफलाइन परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ६६४ केंद्रांमध्ये पोलीस भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस विभागातील १३,१४२ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यासाठी तब्बल १५ लाखापेक्षा आधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING