Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनोखी लायब्ररी

अनोखी लायब्ररी
, शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (00:45 IST)
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्ञान देतात. त्याबदल्यात तुमच्याकडून काहीच मागत नाहीत. खरे तर पुस्तके वाचण्यासाठी कोणतीही वेळ चांगलीच असते. 
 
मात्र काही लोकांना रात्री बिछान्यावर पडल्यावर पुस्तक वाचणे जास्त आवडते. त्यावेळी ते आडवे पडून निवांतपणे वाचन करतात. लोकांची हीच सवय लक्षात घेऊन जपानची राजधानी टोकियोमधील शिनजुकूच्या 'बुक अँड बेड लायब्ररी' नामक वाचनालयाने वाचकांना अशीच मोकळीक देऊ केली आहे. तिथे तुम्ही तुच्या आवडीची पुस्तके वाचू शकतात आणि तीसुद्धा कोणत्याही ठिकाणी. पुस्तक घेऊन खुर्चीवर बसण्याचे तिथे बंधन नाही. 
 
या वाचनालयात लोक आपल्या मनाला वाटेल तर बसून, झोपून व हव्या त्या जागी पुस्तक वाचू शकतात. या वाचनालयात सुमारे दहा हजारांहून जास्त पुस्तके आहेत. तिथे वाचकांसाठी ठिकठिकाणी सोफे ठेवलेले आहेत. छोट्याछोट्या केबिनही आहेत. त्यात लोक बसून वा झोपून पुस्तक वाचू शकतात. 
 
मनाला वाटेल ती जागा निवडण्याची त्यांना मुभा असते. एका व्यक्तीच्या पुस्तक वाचण्याचा दुसर्‍याला अडसर होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. या वाचनालयाची पहिली शाखा नोव्हेंबर 2016 ला सुरू झाली होती. सध्या त्याच्या पाच शाखा आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो