Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर
, सोमवार, 23 जुलै 2018 (08:38 IST)
रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. या फोनसोबत ग्राहकांना ५९४ रुपयांचा सहा महिन्यांसाठी रिचार्जदेखील करावा लागणार असल्याचे कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये म्हटलं गेलंय. असं असल तरीही फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार आहेत. मान्सून ऑफर नुसार हा फोन ५०१ रुपयांत मिळेल आणि १०० टक्के ही रक्कम परत मिळेल असेही कंपनीच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. 
 
सध्याच्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरता येत नाही. पण नव्या फोनमध्ये ही सुविधा असेल. जुना फोन अपग्रेड होणार असल्याचे डायरेक्टर ईशा अंबानीने घोषणा केली. वॉईस कमांड देऊन व्हिडिओ प्ले करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे सारे फिचर्स उपलब्ध होतील. 
 
 
असे आहेत फोनचे फिचर्स 
ड्युअल सिम
२.४ इंच QVGA डिस्‍प्ले
Kai ऑपरेटिंग सिस्‍टिम 
५१२ MB रॅम
४GB इंटरनल स्‍टोरेज, 128GB पर्यंत वाढणार
२००० mAHबॅटरी
२ मेगापिक्‍सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा 
FM, ब्‍लूटूथ, GPS, Wi-Fi, NFC सपोर्ट 
फेसबुक, यूट्यूब, व्‍हाट्सअॅप

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न