Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यू ट्यूबुळे चिमुरडा बनला अब्जाधीश !

यू ट्यूबुळे चिमुरडा बनला अब्जाधीश !
आज तंत्रज्ञानाच्या युगात तर पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी अक्षरशः हजारो पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणच घ्यायचं तर यूट्युबचं घ्या ना ! हल्ली यूट्यूबुळे अनेकांना प्रसिद्धी आणि पैसाही मिळत आहे. नव्वदीतील एक दक्षिण भारतीय आजीबाई अशीच पाककला शिकवून यू ट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. इतक्या वयाच्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलंही हल्ली लोकप्रिय होत आहेत. यू ट्यूबवर फक्त व्हिडिओज पोस्ट करून असाच 6 वर्षांचा एक चिमुकलादेखील अब्जाधीश झाला आहे. 2014 मध्ये अेरिकेच्या एका नर्सरीत शिकणार्‍या रियानला यू ट्यूबवर व्हिडिओ पाहणे खूप आवडत होते. 
 
त्यातही इंटरनेटवर खेळण्यांचे रिव्ह्यू पाहणे त्याला पसंत होते. त्यावेळी 4 वर्षांचा असताना हे व्हिडिओ यू ट्यूबवर नेमके टाकतात कसे, असा प्रश्र्न त्याला पडत होता. रियानने आपल्या पालकांकडे याची चौकशी केली आणि ती पद्धत खूपच सोपी वाटल्याने आपणही यू ट्यूबवर व्हिडिओ टाकू शकतो, असे रियानने व्यक्त केले. आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली आणि 2014 मध्ये रियान टॉयरिव्ह्यू असे यू ट्यूब चॅनल तयार करून दिले. रियानने 2015 मध्ये रियान जायंट एग सरप्राईझचा एक व्हिडिओ अपलोड केला. त्याचा हाच व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो एक-दोन कोटी नव्हे, तर तब्बल 80 कोटी चाहत्यांनी पाहिला. पाहता-पाहता त्याच्या चॅनलच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटीपर्यंत गेली. 2017 मध्ये त्याने यू ट्यूब व्हिडिओज अपलोड करून 11 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्याची ही कमाई अजूनही सुरूच आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युती तुटण्याच्या मार्गावर, उध्वव ठाकरे घेणार मोठा निर्णय