Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

४५१ मतदार करणार गृह मतदान, मतदानाची गोपनीयता पाळली जाणार

election
, सोमवार, 8 एप्रिल 2024 (09:04 IST)
रिसोड (Washim) : केंद्राच्या सेवेत असलेल्यांना टपाल मतदानाची (पोस्टल बॅलेट) सोय आहे. परंतु यंदा ही सोय दिव्यांग तसेच ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Election Commission) भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत एकूण ४५१ नागरिकांनी (House voting) गृह मतदानाची इच्छा दर्शविली आहे. आगामी ) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे.
 
भारत निवडणूक आयोगानेसुद्धा पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांगांना गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांना नमुना १२- डी देण्यात आला. मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ) गृह मतदानासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. यात फॉर्म १३ ए (डिक्लरेशन), फॉर्म १३ बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म १३- सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म १३ डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना
 
अशी राहील प्रक्रिया
गृह मतदानासाठी घरी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिक्लेरेशन म्हणजे फॉर्म १३-ए अचूक भरून घ्यावयाचे आहे. मतदान केलेल्या पत्रिकेची उभी घडी करून सदर पत्रिका छोटा लिफाफा म्हणजे फॉर्म १३- बी मध्ये टाकावा. डिक्लरेशन आणि छोटा लिफाफा दोन्ही कव्हर बी लिफाफा म्हणजेच फॉर्म १३-सी मध्ये टाकावा. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गृह मतदानाची व्हीडीओग्राफी करण्यात येणार आहे.  रिसोड मालेगाव  विधानसभा मतदारसंघातील४५१ मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित न राहता मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने ३० पथके तयार केली आहेत.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेपाळमध्ये राजकीय गट आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष