Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींना अडाणी अंबानी कडून किती पैसे मिळाले; पंतप्रधानाचा राहुल गांधींना टोला

narendra modi
, बुधवार, 8 मे 2024 (18:16 IST)
तेलंगणातील हैद्राबाद येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टोला लगावला ते म्हणाले, अंबानी, अदानीच्या नावाच्या जप करणाऱ्या राजपुत्राला किती पैसे मिळाले त्यांनी लोकसभा निवडणूकच्या वेळी  त्यांना शिव्या देणं का बंद केलं.  

सभेत जनतेला संबोधित करताना ते म्हणाले आपण बघितलं आहे की काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी  गेल्या पाच वर्ष पासून दररोज सकाळी उठल्यापासून अडाणी अंबानींच्या नावाचा जप करायचे पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. नंतर हळू हळू त्यांनी शिव्या देणं कमी केलं.असं का झालं त्यांना अडाणी अंबानींकडून किती पैसे मिळाले आहे.

किती नोटा त्यांना मिळाल्या आहेत. काही तरी कुठे शिजत आहे. पाच वर्ष अडाणी अंबानींना शिव्या दिल्या नंतर ते बंद झालं. म्हणजे चोरीचा माल मिळाला आहे. याचे उत्तर देशाला द्यावे लागणार.   
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर समाजातील गरीब वर्गाला मदत करण्याऐवजी उद्योगपतींना मदत करण्याचा आरोप केला होता. 
 
तेलंगणाच्या करीम नगर मध्ये जनतेला संबोधित करताना मोदींनी एनडीए सरकारच्या योजनांची स्तुती केली. ते म्हणाले एनडीए सरकार ने गेल्या 10 वर्षात प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.आणि पुढे नेले आहे. आम्ही शेतीच्या क्षेत्रात आधुनिकीकरण करत आहोत. नैसर्गिक शेती, नॅनो इंडिया आणि ड्रोनला प्रोत्साहन देणे 
 
पंतप्रधान म्हणाले, 'तेलंगणाच्या निर्मितीवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. बीआरएसने लोकांची स्वप्ने मोडली. काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. स्वतंत्रता नंतर काँग्रेसने हेच केले. देशाचं काहीही होऊ द्या. देश बुडू द्या. पण या कुटुंबाला काहीच फरक पडत नाही. परिवारवादामुळे काँग्रेसने पीव्ही नरसिंह रावांचा अपमान केला. त्यांच्या  निधनांनंतर  त्यांच्या  पार्थिवाला काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला नाही. पण पीव्ही नरसिंह राव यांना भारत रत्न देऊन भाजपने गौरवले.

काँग्रेस देशाची क्षमता नष्ट करत असल्याचा आरोप मोदींनी केला. तुम्ही मला सांगा काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली की नाही. शतकानुशतके शेती आणि कापड ही देशाची ताकद आहे, पण काँग्रेसने त्यांचाही नाश केला. देशातील सर्व समस्यांचे मूळ काँग्रेस आहे.असं म्हणत त्यांनी 

Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टी-20 क्रिकेटमध्ये युझवेंद्र चहलने इतिहास रचला