Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुक्रवार 10 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा

raj thackeray
, मंगळवार, 7 मे 2024 (21:38 IST)
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सध्या सर्वत्र प्रचार सभा सुरु आहे. लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा येत्या शुक्रवारी 10 मे रोजी पुण्यात सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकरांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली.

ते म्हणाले, पुणेकर मतदार राजठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतात.पुण्यात मनसेला मानणारा मोठा मतदार संघ आहे. मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये मोहोळ यांच्या प्रचारासाठी उतरले आहे. त्यांची ही सभा यशस्वी होण्यासाठी सर्व जण काम करत आहे. या सभेला चांगलीच गर्दी होईल अशा विश्वास बाळगतो. सभेमुळे वाहतूक कोंडी होणार आहि या साठी सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आढावा घेतला.  

या साठी मनसे कार्यालयात मनसे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मनसेचे येते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजेश पांडे, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, अजय शिंदे, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर आणि इतर गणमान्य नेते उपस्थित होते. 
 
Edited By- Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल