Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीतील छोटे 'जय - वीरु'

मराठीतील छोटे 'जय - वीरु'
शालेय जीवनातील दोन अल्लड मित्रांच्या कथेवर आधारित अंड्याचा फंडा या सिनेमाचा ट्रेलर सध्या भरपूर गाजत आहे. बच्चेकंपनी पासून ते थोरामोठ्यांपर्यंत या सिनेमाच्या ट्रेलरने आणि खास करून 'डुबुक डुबुक' गाण्याने मोठी धूम ठोकली आहे. अंड्या आणि फंड्या या सिनेमातील दोन पात्रांना रसिकांनी 'जय-विरू' ची जोडी असे देखील नामकरण करून टाकले आहे. ज्याप्रमाणे 'शोले' च्या जय-विरूची जशी स्कूटर आहे तशीच एक सुंदर सायकल या दोघांचीदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 
 
अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित ह्या सिनेमाचे लिखाण व दिग्दर्शन संतोष शेट्टी यांनी केले आहे. 
 
webdunia
अंड्या आणि फंड्या अशी या सिनेमातील दोन पात्रांची नावे असून, त्यांच्या मैत्रीचा धम्माल पण तितकाच गूढ फंडा ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 
अथर्व बेडेकर (अंड्या) आणि शुभम परब (फंड्या) या बालकलाकारांनी ही दोन पात्र साकारली असून. या दोघांची ऑफ-स्क्रिन मैत्रीदेखील अगदी तशीच घनिष्ट आहे. खऱ्या आयुष्यात अथर्व आणि शुभम लहानपणापासूनचे चांगले मित्र असून, त्यांची हि ट्युनिंग चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 

तसेच आतापर्यंत मराठीतील अनेक चित्रपटात दोन मित्राच्या जोडीला 'जय-विरू' ने नावाजले गेले असेल, पण पहिल्यांदाच बाल कलाकारांची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन जोडी 'अंड्या चा फंडा'या सिनेमाच्या निमित्ताने सुपर डूपर हिट ठरलेली दिसून येत आहे.

तसेच मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एक युनिक विषय हाताळला जात असल्यामुळे, ह्यात अंड्या नेमका कोणता फंडा मांडणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता 'जय मल्हार' मालिका हिंदीमध्ये