Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धमाकेदार 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाचे लाँच

धमाकेदार 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाचे लाँच
मुंबई , बुधवार, 13 मे 2015 (17:16 IST)
निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. मग ती कोणत्याही भाषेतील असो वा प्रांतातील अशा सिनेमांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशीच एक अनोखी प्रेम कहाणी 'कॅरी ऑन मराठा'च्या निमित्ताने पाहायला मिळेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर ही प्रेमकथा रंगताना दिसेल. अंधेरीतील द क्लब या पंचाताराकीत हॉटेलमध्ये 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाच्या फर्स्ट लूक लाँचचा झालेला सोहळा खरच डोळे दिपवणारा होता.  मार्तंडच्या झालेल्या  धमाकेदार एन्ट्रीने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. जुलै २०१५ ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला  मनोरंजनाची झकास फोडणी दिली आहे. जी प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आहे.  या निमित्ताने ग्श्मीर महाजनी हा देखणा, दमदार, तरुणींच्या दिलाची धडकन चुकवणारा हँडसम हिरो मराठी सिनेसृष्ठीत पदार्पण करत आहेत. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी ही कुसुम नावाच्या एका कानडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मार्तंड आणि कुसुम यांच्यात फुलणारी प्रेमकहाणी सिनेमाचा गाभा आहे. 
 
नंदा आर्ट्स आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाचे दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केले आहे. नंदा आर्ट्सच्या निर्मात्या सौ. नंदा चंद्रभान ठाकूर आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या निर्मात्या शशिकला  क्षीरसागर म्हणाल्या, मनोरंजनाची उत्तम भट्टी 'कॅरी ऑन मराठा' सिनेमामध्ये जमून आली आहे. संजय लोंढे यांचे उत्तम दिग्दर्शन आणि सगळ्याच कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक नक्की हा सिनेमा थियेटरमध्ये जाऊन पाहतील.  याच सिनेमाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक संजय लोंढे म्हणाले,  गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे आले आहे. मात्र कॅरी ऑनच्या निमित्ताने कम्प्लीट एंटरटेनमेंट सिनेमा पाहायला मिळेल. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विविध भागांमध्ये सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. दिगदर्शक म्हणून माझे देखील पहिलेच पदार्पण आहे. गेल्या १५ वर्षांपासून मी हिंदी म्रराठी तसेच इतर भाषेतील सिनेमात पडद्याआड राहून काम केले आहे. मात्र 'कॅरी ऑन मराठा' माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे ज्यामुळे मी दिग्दर्शकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. प्रखात दिग्दर्शक अब्बास मस्तान, प्रियदर्शन, आशुतोष गोवारीकर, निखिल अडवाणी यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभवामुळे माझ्यातील दिग्दर्शकावर सगळ्याच गोष्ठीचे संस्कार झाले. 
 
गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी सिनेमासाठी गीते लिहिली असून शैल आणि प्रीतेश यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजाचा स्वरसाज सिनेमाला चढला आहे.  तसेच अरुण प्रसाद यांचे छायांकन,  राजू खान, अदील शेख, सूजीत कुमार यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात मराठी सोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी काम केले आहे. त्यात अरुण नलावडे, अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर कौशल - मोझेस यांनी डीरेक्ट केले तुफान एक्शन सीन प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. असा हा कम्प्लीट एंटरटेनमेंटचा पँकेज असलेला कॅरी ऑन मराठा हा सिनेमा येत्या जुलैला महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi