Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुपेरी पडद्यावर अवतरणार दगडी चाळ

रुपेरी पडद्यावर अवतरणार दगडी चाळ
, सोमवार, 7 सप्टेंबर 2015 (11:03 IST)
आज रुपेरी पडद्यावर 1996 च्या मुंबईतील परिस्थिती पाहणे मनोरंजनाचा एक भाग झाली आहे पण त्या काळी प्रत्यक्ष अनुभवणार्‍यांच्या मनात एक विदारक घर करून बसली आहे. त्यात आजही दगडी चाळ आणि डॅडी अरुण गवळी वारंवार चर्चेत येणार्‍या नावांपैकीच एक नाव आहे.
 
त्या काळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणार्‍या अरुण गवळी आणि त्यांचे सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ आपल्या सर्वानाच माहीत आहे. पण गँगवॉर्समध्ये अडकलेल्या मुंबईत हा वाम मार्ग तेव्हा काही सगळ्यांनीच राजीखुशीने निवडला नव्हता. अशाच प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने या प्रवाहात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित झालेला दगडी चाळ हा रंजक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
मराठी सिनेसृष्टीच्या कारकीर्दीत दगडी चाळ अशा व्यक्तिरेखांवर आधारलेला हा पहिला वहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक असून या चित्रपटाचा केंद्रबिंदू गँगवॉर किंवा अरुण गवळी नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा असल्यामुळे यंगस्टर्ससाठी एक पर्वणीच असेल. मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 2 ऑक्टोबर 2015 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून एकूणच मराठीतील हा पहिला वहिला स्टालीश दगडी चाळ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi