Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहल कणेरीमठाची

सहल कणेरीमठाची
, शनिवार, 11 जून 2016 (12:19 IST)
कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. कणेरीमठ येथील सिद्धगिरी म्युझियम प्रेक्षणीय आहे. 
 
ही सहल मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ठरेल. सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण पुणे-बेंगलोर महामार्गावर आहे.
 
शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचा एक नमुनाच इथे पाहायला मिळतो. अंतर कमी असल्याने खासगी वाहनाने किंवा राज्य महामंडळाच्या बसने इथे जाता येते. इथे पोहोचल्यानंतर मेष, सिंह, कन्या आदी बारा राशींची शिल्पे दृष्टीला पडतात.
 
त्यानंतर एका गुहासदृश भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल ऋषीमुनींचे पुतळे इथे उभारण्यात आल्याचे दिसतात. प्रत्येक ऋषीचे नाव, त्यांची विद्या, त्यांचे योगदान यासह आवश्यक ती तसेच सर्व सामान्यांना माहीत नसलेली माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली अहे. या शिल्पांचा कोरीवपणा आणि सुबकता यामुळे हे पाहताना अर्धा ते पाऊणतास कसा निघून जातो ते कळत नाही.
 
webdunia
या गुहेतून बाहेर पडताच समोर दिसतं ते हिरवंगार शेत आणि या शेतात काम करणारी माणसं. इथूनच सुरू होतो तो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास. हळूहळू या माणसांच्या जवळ जाताच आपल्या लक्षात येतं की ही माणसं नसून माणसांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. धानची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया या प्रतिकृतीमधून दाखविण्यात आली आहे. यासोबत शेतामध्ये बैल, गायी, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोर, लंगडी, सूर-पारंब हे खेळ त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडविणार्‍या या प्रतिकृती जिवंत वाटाव्यात इतके बारकावे यामध्ये टिपले आहेत.
 
इथे भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हॉटेलच्या माध्यमातून जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
पर्यटकांसाठी शॉपिंग सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. चांभार, लोहार, न्हावी, शिंपी, सोनार, वासुदेव, पिंगळा यांची शिल्पेही मोहक आहेत. 
 
ग्रामीण भागात असणार्‍या विविध घरांचे नमुने इथे पाहाला मिळतात. इथल काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठात प्रवेश करताच मनाला शांतता मिळते.
म. अ. खाडिलकर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तमन्ना भाटिाचे मेकअपमनशी प्रेमसंबंध