'रेडा'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. 
 
वर्ष 2018मध्ये संक्रातीचे वाहन आहे रेडा. रविवार  दि. 14 2018 म्हणजेच पौष कृष्ण त्रयोदशी रोजी दु. 1.46 वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करती आहे. 
 
संक्रांतीचा पुण्यकाल- रविवार दि. 14 रोजी दुपारी 1.46 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. 
 
हे संक्रमण वणिज करणावर होत असल्याने वाहन रेडा आहे. उपवाहन उंट आहे तिने निळे वस्त्र परिधान केले असून हातात शस्त्र म्हणून तोमर धारण केले आहे. तिने अळिताचा तिलक लावला आहे. वयाने वृद्ध असून बसली आहे. सुवासासाठी हातात रूई घेतला आहे. ती दही भक्षण करीत असून तिची जाति हरीण आहे. भूषणार्थ निळ धारण केल आहे. वार नाव घोरा असून नाक्षत्र नाव राक्षसी आहे. समुदाय मुहूर्त 30 आहेत. उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे. व नैऋत्व दिशेस पाहत आहे. 
 
संक्रांतीचे फळ- संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत. त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. 
 
पर्वकालात द्यावयाचे दान- नवे भांडे, गाईला गास, अन्न भरलेले भांडे, लोकरीचे कपडे, तूप, सोने, कपडे फळे, तिळाचे लाडू, बांगड्या, आरसा, नारळ हळदी कुंकू व उपयुक्त असणार्‍या वस्तू इत्यादी. 
 
किंक्रांत- करिदिन सोमवार दि. 15 रोजी आहे. 
 
संक्रांतीमध्ये वर्ज्य कर्मे- संक्रांती पुण्यकालात कठोर बोलणे, भांडणे टाळावित.

संबंधित माहिती

LOADING