Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्य संस्कृतीची पूजा

सूर्य संस्कृतीची पूजा

वेबदुनिया

भारतीय संस्कृतीत सूर्याची पूजा प्राचीन काळापासून केली जाते. रामायण काळात त्याचे पुरावेही मिळतात. मर्यादापुरूषोत्तम श्रीराम रोज सूर्यपूजा करत होते. श्रीराम हे सूर्यवंशी होते.

भगीरथ राजाही सूर्यवंशी होता. याच भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले आणि आपल्या पूर्वजांना सद्गती मिळवून दिली. कपिल मुनींच्या आश्रमात गंगेचे आगमन झाली, तो दिवसही मकर संक्रांतीचाच होता. या गंगाजलाच्या स्पर्शानेच भगीरथ राजाच्या पूर्वजांना मुक्ती मिळून स्वर्गाची प्राप्ती झाली होती.

भगीरथाने गंगाजल, अक्षता आणि तीळ यांच्या सहाय्याने श्राद्ध तर्पण केले होते. म्हणूनच या दिवशी माघ मकर संक्रातीला स्नान आणि श्राद्ध-तर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे. यावेळी कपिल मुनींनी आशीर्वाद देताना सांगितले होते की, गंगा त्रिकाल लोकांचे पापक्षालन करेल आणि भक्तांच्या सात पिढ्या उद्धरेल. त्यांना मोक्ष मिळवून देईल.

महाभारतात भीष्मांनी सूर्याचे उत्तरायण झाल्यानंतरच माघ शुक्ल अष्टमीला प्राणत्याग केले होते. त्यांचे श्राद्धही सूर्याच्या उत्तरायणातच घातले गेले. म्हणूनच आताही पितरांना प्रसन्न करण्यासाठी तीळाचे अर्घ्य व जल तर्पण करण्याची प्रथा आहे.

सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो. परा-अपरा विद्येच्या प्राप्तीचा काळही हाच मानला जातो. साधनेचा सिद्धीकाळही हाच असतो. या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना, गृहनिर्मिती, यज्ञ-कर्म आदी पुण्यकर्मे केली जातात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या एक दिवस आधीच उपवास करून दानधर्म केला पाहिजे.

सूर्याच्या सात किरणांचा वेगवेगळा प्रभाव पडतो. पहिला किरण आसूरी संपत्तीमूलक भौतिक उन्नतीचे प्रतिनिधित्व करणारा आहे, तर सातवा किरण दैवी संपत्तीमूलक आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देणारा आहे. सातव्या किरणांचा प्रभाव भारतातील गंगा यमुनेच्या मध्यात दीर्घकाळ रहातो. या भौगोलिक स्थितीमुळेच हरिद्वार व प्रयागमध्ये माघ मेळा अर्थाच मकर संक्रांतीला पूर्ण कुंभ व अर्धकुंभ साजरा केला जातो.

मकरसंक्रांत व श्राद्ध कर्माचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. तीळाचे महत्त्वही नोंदवले आहे. आरोग्यासाठी आणि कल्याणासाठीही तीळ महत्त्वाचेच आहेत. सहा प्रकारे तीळाचा उपयोग फायदेशीर आहे. 1. तीळ जल स्नान, 2. तीळ दान ,3. तीळ भोजन, 4.तीळ जल अर्पण, 5. तीळ आहूती, 6. तीळ उटणे. 

थोडक्यात सूर्य संस्कृतीत मकर संक्रांतीचे पर्व ब्रह्मा- विष्णू, महेश, गणेश, आद्यशक्ती व सूर्याच्या उपासनेचे पावन व्रत आहे. त्यामुळे तन-मन- आत्म्याला शक्ती मिळते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विवाहाच्या वाटेवर : सप्तपदी