Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shri Gajanan Maharaj Aarti श्री गजानन महाराजांची आरती

gajanan maharaj
श्री गजानन महाराजांची आरती

दुपारची आरती
 
श्रीमत् सद्गुरु स्वामी जय जय गणराया । आपण अवतरला जगि जड जिव ताराया ।। ध्रु. ।।
ब्रह्म सनातन जे का तें तूं साक्षात। 
स्थावरजंगमि भरला तुम्हि ओतप्रोत। 
तव लीलेचा लागे कवणा नच अंत।। 
तुज वानाया नुरले शब्दहि भाषेत ।।1।।
वरिवरि वेडेपण ते धारण जरि केले। 
परि सत्सवरुपा आपुल्या भक्तां दाखविले।। 
निर्जल गर्दाडसी जल ते आणविले। 
विहंग नभीचे काननि आज्ञेत वागविले ।।2।।
दांभिक गोसाव्यातें प्रत्यय दावून। 
ज्ञानिपणाचा त्याचा हरिला अभिमान।। 
ओंकरेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन।। 
नर्मदेने भक्तां करवियले रक्षण ।।3।।
अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा ।। 
दुस्तरशा भवसागरि तरण्या दे हाता।। 
वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता। 
दासगणूच्या ठेवा वरद करा माथा ।।4।।

गजानन बावन्नी
 
 
जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया ।
।। जयदेव जयदेव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।
।। जयदेव जयदेव ।।१।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूंचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ।
।। जयदेव जयदेव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविले त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।
।। जयदेव जयदेव ।।३।।
व्याधी वारून केलें कैका संपन्न ।
करविले भक्तालागी विठ्ठल-दर्शन ।
भवqसधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन ।
।।जयदेव जयदेव ।।४।।

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भानु सप्तमी व्रत कथा