Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळ्यतील 'या' मेकअप टिप्सने खुलवा तुमचे सौंदर्य

पावसाळ्यतील 'या' मेकअप टिप्सने खुलवा तुमचे सौंदर्य
, गुरूवार, 28 जून 2018 (17:00 IST)
महिला म्हटले, की मेकअप हा आलाच. मग, तो कोणताही ऋतू असो त्या मेकअपशिवाय बाहेर पडूच शकत नाहीत. परंतु ऋतूनुसार मेकअपमध्ये काही बदल करावे लागतात. जेणेकरुन केलेला मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि तुमचे सौंदर्यही खुलेल...
 
लिपस्टिक - या दिवसात मॅट फिनिशिंग असलेली लिपस्टिक लावावी. ग्लॉस फिनिशिंग असलेली लिपस्टिक देखील तुम्ही वापरू शकता. नॅचरल कलरच्या लिपस्टिकची निवड या काळात योग्य ठरते. लिपस्टिक नेहमी चांगल्या कंपनीचीच वापरा.
 
डोळे - डोळे हे चेहर्‍याचे सौंदर्यात अधिकच भर घालतात. मात्र पावसाने तुमच्या डोळ्याचा मेकअप खराब होऊ शकतो. यामुळे हा मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. याच्या मेकअपसाठी तुम्ही वॉटरप्रूफ पेन्सिल लायनर वापरू शकता.
 
फाउंडेशन - पावसाळ्यात चेहर्‍यावर शक्यतो फाउंडेशन लावणे टाळावे. पण जर लावायचेच असल्यास कंसलिर, लिक्विड फाउंडेशन किंवा लूज पावडर वापरा.
 
प्रि-बेस मेकअप - तुमच्या त्वचेनुसार प्रि-बेस मेकअप करावा. यामुळे चेहर्‍यावरील PH बॅलेन्स होण्यास मदत होते. ड्राय स्किन असणार्‍या महिलांनी क्रीम बेसचा वापर करावा तर तेलकट स्किन असणार्‍या महिलांनी मॅट क्रीमचा वापर करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसांना लावत असलेल्या मेंदीत हे पदार्थ मिसळा आणि फरक पहा